अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या पायल घोषच्या अडचणीत वाढ होणार?

अभिनेत्री ऋचा चड्ढानं (Richa Chadha) पायल घोष (Payal Ghosh) विरोधात  मादिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. नहानीचा दावा ठोकला होता.

मुंबई हायकोर्टात पायलच्या वकिलांनी पायल ऋचाची माफी मागायला आणि आपलं वक्तव्य मागे घ्यायला तयार असल्याचं म्हटलं. मात्र २४ तासांतच पायल पलटली.

अभिनेत्री पायल घोषने ऋचा चड्ढानं कोर्टात केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर नवं ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिनं म्हटलं आहे की, “मी कुणाचीही माफी मागणार नाही. मी काहीच चुकीचं केलं नाही आहे आणि कुणाविरोधातही वक्तव्य केलं नाही. मला अनुराग कश्यपनं जे सांगितलं तेच मी सांगितलं.”

अनुरागनं 2014 मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केलं, असं पायलनं आपल्या आरोपामध्ये म्हटलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पायलनं या घटनेबाबत बोलताना ऋचा चड्ढाच्या नावाचाही उल्लेख केला होता. त्यानंतर ऋचाने पायलविरोधात हायकोर्टात धाव घेतली आणि पायलविरोघात एक कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला.

अभिनेत्री पायल घोषनं सांगितलं की, अनुराग कश्यपनं तिला आपल्या घरी बोलावलं होतं, तेव्हा नशेत तिच्यासह जबरदस्ती केली. जेव्हा आपण याला विरोध केला तेव्हा अनुरागनं माही गिल, ऋचा चड्ढा आणि हुमा कुरैशी यासारख्या अनेक अभिनेत्रींची नावं आपल्यासमोर घेतली, असं पायल एका मुलाखतीत म्हणाली. पायलनं या प्रकरणात ऋचा चड्ढाचं नाव आणताच ऋचा चड्ढानं तिच्याविरोधात मानहानीचा दावा केला.

"मी एक महिला आहे. आणि प्रत्येक महिलेला योग्य तो आदर मिळायला हवा. या मताची मी आहे. पण एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेवर बिनबुडाचे आरोप करताना विचार करायला हवा" असं ऋचा चड्ढानं आपल्या कायदेशीर नोटिसीत म्हटलं आहे.


हेही वाचा

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

सिंघम फेम अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात

पुढील बातमी
इतर बातम्या