Advertisement

सिंघम फेम अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात

हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल येत्या ३० ऑक्टोबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहे.

सिंघम फेम अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात
SHARES

हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल येत्या ३० ऑक्टोबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. तिनं आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. गौतम किचलूबरोबर मुंबईत एका छोटेखानी समारंभात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं काजलनं सांगितलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये काजलनं लिहिलं आहे की, '३० ऑक्टोबर २०२० रोजी मी गौतम किचलूसोबत मुंबईत लग्न करणार आहे. या खासगी आणि छोटेखानी सोहळ्यात फक्त आमच्या कुटुंबातील सदस्यच सहभागी होतील.'







View this post on Instagram









Appreciation for the little things.

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

गेल्या महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. गौतम किचलू हा एक व्यवसायिक असून तो इंटेरिअर डिझाईन आणि होम डेकोरशी संबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'डिसर्न लिव्हिंग'चा मालक आहे. तर काजल सिंघम, स्पेशल 26, मगधीरा अशा चित्रपटांमध्ये दिसली आहे.



हेही वाचा

अभिनेता अजय देवगणच्या भावाचं निधन

Bigg Boss 14 : जाणून घ्या कोण आहेत जान कुमार सानू?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा