Advertisement

अभिनेता अजय देवगणच्या भावाचं निधन

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगण यांचं मुंबईत निधन झालं.

अभिनेता अजय देवगणच्या भावाचं निधन
SHARES

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगण यांचं मुंबईत निधन झालं. मीडिया रिपोर्टनुसार, ते ५१ वर्षांचे होते. अजयनं एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. कोरोनाच्या सद्य परिस्थितीमुळे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचं अजयनं सांगितलं.


अनिल देवगण यांच्या निधनाची माहिती देताना अजयनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगणला कायमचे गमावले. त्यांच्या अकाली निधनानं आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अजय देवगण फिल्म्स आणि मला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. कोरोनामुळे प्रार्थना सभा घेण्यात येणार नाहीये,' असं अजयनं ट्विटमध्ये सांगितलं.

अनिल देवगण यांनी आपल्या कारकीर्दीतील बहुतेक काम अजय देवगणसोबत केलं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. १९९६ मध्ये आलेल्या 'जीत' या चित्रपटाव्यतिरिक्त अजय देवगणच्या जान, इतिहास, प्यार तो होना ही था आणि हिंदुस्थानच्या कसम या चित्रपटांचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते.

२००० मध्ये अनिल यांनी दिग्दर्शक म्हणून 'राजू चाचा' हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर २००५  मध्ये 'ब्लॅकमेल' आणि २००८ मध्ये 'हाय-ए-दिल' या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार' या चित्रपटाचे ते क्रिएटिव्ह डायरेक्टर होते.



हेही वाचा

‘अशी’ सुरू होतील देशभरातील सिनेमागृह

अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोनामुक्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा