Advertisement

अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोनामुक्त

काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणं असल्याचं जाणवू लागलं होतं. निवेदिता सराफ यांचा १५ सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोनामुक्त
SHARES

मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ या कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणाला त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. या मालिकेच्या सेटवर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणं असल्याचं जाणवू लागलं होतं. निवेदिता सराफ यांचा १५ सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होत. त्या दिवसापासून ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. त्यांचे सहकलाकार तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांची तसंच त्यांच्या घरात अशोक सराफ आणि इतर सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे, रोहित राऊत, अभिजीत केळकर यांच्यासह मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता लॉकडाऊन अंतर्गत सरकारने  शुटिंगसाठी बंदी घातली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून  सेटवर योग्य ती खबरदारी बाळगून  मालिका, चित्रपटांची शुटिंग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. हेही वाचा -

Bigg Boss 14 : जाणून घ्या कोण आहेत जान कुमार सानू?

'बिग' डिसीजन! अमिताभ बच्चन करणार अवयवदान


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा