Advertisement

'बिग' डिसीजन! अमिताभ बच्चन करणार अवयवदान

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ऑर्गन डोनेट करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

'बिग' डिसीजन! अमिताभ बच्चन करणार अवयवदान
SHARES

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ऑर्गन डोनेट करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. अमिताभ बच्चन हे ट्विटरवर चांगलेच सक्रिय आहेत. त्यांचे विचार ते ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात.

अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्यांच्या कोटवर एक लहान हिरव्या रंगाची रिबन दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिलं आहे की, 'मी ऑर्गन डोनर होण्याची शपथ घेतली आहे. यासाठी मी हिरवी रिबन लावली आहे.'

अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी अवयव दानाची शपथ घेतल्याचा स्वत:चा अनुभव शेअर केला आहे. तर काहींनी त्यांचे सर्टिफिकेट देखील शेअर केले आहे. तर काहींनी बच्चन यांच्यापासून प्रेरित होत ऑर्गन डोनर बनण्याचा निश्चय केला आहे.

सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीचा १२ (Kaun Banega Crorepati 12) वा सीझन होस्ट करत आहेत. याशिवाय अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये (Brahmastra) देखील अमिताभ दिसणार आहेत.

या चित्रपटात त्याच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय दिसणार आहेत. या चित्रपटाशिवाय ते नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटातही काम करत आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.हेही वाचा

आमीर खानच्या पाणी फाऊंडेशननं 'या' गावात उभारलं जंगल

कंगनाचं ‘ते’ वक्तव्य चुकीचंच, उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

संबंधित विषय
Advertisement