Advertisement

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

अविनाश खर्शीकर यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून चिंताजनक होती. अखेर सकाळी ठाणे इथल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं गुरूवारी सकाळी निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. अविनाश खर्शीकर यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून चिंताजनक होती. अखेर सकाळी ठाणे इथल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली होती. तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती.

अविनाश खर्शीकर यांनी १९७८ मध्ये 'बंदिवान मी या संसारी' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार या सारख्या अनेक सिनेमात अविनाश खर्शीकर यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

अनोख्या शैलीमुळे ते तरुणींच्या गळ्यातले ताईत बनले होते. ९० च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांच्या लुकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती. सदाबहार अविनाश खर्शीकर यांनी दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ महत्त्वाची भूमिका साकारली होती.



हेही वाचा

अभिनेता अजय देवगणच्या भावाचं निधन

अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोनामुक्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा