IRCTC च्या योजनेअंतर्गत 'हाऊसफुल ४'चं 'प्रमोशन ऑन व्हिल्स'

रेल्वेच्या महसुलात भर पडावी आणि अतिरिक्त कमावी व्हावी म्हणून रेल्वेनं एक आयडियाची कल्पना केली आहे. नवीन योजनेअंतर्गत जाहिरातींसाठी ट्रेन बुक करण्याचा उपक्रम रेल्वेनं सुरू केला आहे. या अंतर्गत आता कला, संस्कृती, चित्रपट, कार्यक्रम, क्रीडा इत्यादी गोष्टींच्या जाहिराती रेल्वेमध्ये करू शकता. पण यासाठी काही खासच रेल्वेच्या गाड्या असतील.

प्रमोशन ऑन व्हिल्स

रेल्वेनं आपल्या या उपक्रमाला 'प्रमोशन ऑन व्हील्स' असं नाव दिलं आहे. या योजनेचा श्री गणेशा बॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनपासून झाला आहे. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारनं हाऊसफुल ४ या चित्रपटाच्या प्रमोशन विशेष ट्रेन बुक केली. या ट्रेनमध्ये 8 डबे आहेत.  आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेनं चालवलेली ही पहिली विशेष 'प्रमोशन ऑन व्हील्स' ट्रेन असणार आहे. ही ट्रेन 'हाऊसफुल 4'च्या टीमच्या समन्वयानं बुधवारी मुंबई सेंट्रल इथून सुटली आणि गुरुवारी दिल्लीला पोहोचली.

कुठे फिरणार ही ट्रेन

ही ट्रेन महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमधून आणि महत्त्वपूर्ण जिल्ह्यात फिरणार. चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी रेल्वेनं एफटीआर गाड्यांचा वापर करण्याची ऑफर दिली. या गाड्यांचं सर्व नियोजन आणि व्यवस्थापन आयआरसीटीसीकडे असणार आहे. आगामी येणाऱ्या चित्रपटांचे प्रमोशन देखील रेल्वेमार्फत करण्यासाठी, रेल्वेनं अनेक प्रॉडक्शन हाऊसला आधीच संपर्क साधला आहे.

हाऊसफुल टीमची धम्माल

हाऊसफुल ४ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीमनं आयआरसीटीच्या ट्रेननं प्रवास केला. अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, बॉबी देओल, किर्ती सेनन, चंकी पांडे आणि इतर स्टारकास्ट हजर होती. यावेळी त्यांनी जबरदस्त धम्माल केली. अक्षयनं तर रेल्वेत चहा कोण चांगला विकू शकतं याची स्पर्धा देखील घेतली. यात रितेश देशमुख आणि चंकी पांडेनं बाजी मारली.  


संजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...

राजकुमार रावच्या बाईकची किंमत ऐकून धक्का बसेल

पुढील बातमी
इतर बातम्या