रघु राम, राजीव लक्ष्मणचं डिजिटल क्षेत्रात पाऊल, अॅमेझॉनवर घेऊन येतायेत नवा शो

एमटीव्हीवर येणाऱ्या 'रोडीज' या शोमुळे प्रसिद्ध जोतात आलेले रघु राम आणि राजीव लक्ष्मण ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. अॅमेझॉन प्राईम ओरीजनल शो 'स्कल्स अॅण्ड रोजेज' या शोमध्ये दोघं एकत्र झळकणार आहेत. डिजिटल मीडियामध्ये दोघांचं पहिलं पाऊल असून दोघंही यासाठी फार उत्सुक आहेत.  

अनुभवा रोमांस अॅण्ड थ्रील

शोमध्ये दोन आयलँड आहेत ज्यांची नावं आहेत स्कल्स अॅण्ड रोजेज. या आयलँडच्या नावानरूनच शोचं नाव ठेवण्यात आलं आहे. स्कल्स हे आयलँड रघु आणि रोजेज हे आयलँड राजीव सांभाळणार आहे. यात १६ स्पर्धक असतील ज्यांना वेगवेगळे टास्क करत पुढं जावं लागेल.

'डिजिटलवर स्वातंत्र'

मुंबई लाइव्हला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये रघु आणि राजीव यांनी टीव्ही आणि डिजिटल यात किती आणि कसा फरक आहे यावर आपलं मत मांडलं.

प्रत्येक घरात एक टीव्ही असतो. घरातील सर्वच मंडळी एकत्र बसून टीव्हीवरील कार्यक्रमाचा आनंद घेत असतात.कुटुंबातील लहान सदस्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण टीव्ही पाहतात. त्यामुळे टीव्हीवरील कंटेंट त्यानुसारच ठेवावा लागतो. पण डिजिटलमध्ये असं नाही. डिजिटलमध्ये प्रत्येक जण त्याला जे बघायचं आहे ते स्वत: निवडू शकतो. त्यावर कुठली बंधनं येत नाहीत. 

- रघु राम

डिजिटलमध्ये कसली बंधनं  नसतात हे खरं आहे. पण बंधनं नसली तरी सेक्स सिन्स आणि शिव्यांचा भडीमार करून सिरीज चालतातच असं नाही. तशी स्टोरी देखील पाहिजे. शिव्यांचा भडिमार करून सिरीज चालत नाहीत. 

- राजीव लक्ष्मण

राजीव हेही पुढे बोलला की, "डिजिटलमध्ये काही बंधनं नाहीत म्हणून आम्ही या शोमध्ये फक्त शिव्या आणि सेक्स सिन एवढ्यावरच भर दिला नाही. डिजिटलवर येणाऱ्या आमच्या पहिल्या शोमध्ये टीव्हीवरसारखाच कंटेंट पाहायला मिळणार आहे. आमचं या शोमध्ये एकच काम असणार आहे ते म्हणजे इथल्या स्पर्धकांसाठी समस्या निर्माण करणे. तर स्पर्धक त्यातून कशाप्रकारे बाहेर पडतात हे देखील यात पाहायला मिळणार आहे."


हेही वाचा

क्रांती रेडकरचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड 'झेडझेड'

अनोख्या परंपरेचं दर्शन घडवणार 'बकाल'मधील 'घेऊन जा गे मारबत...'


पुढील बातमी
इतर बातम्या