Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

अनोख्या परंपरेचं दर्शन घडवणार 'बकाल'मधील 'घेऊन जा गे मारबत...'

देशभरातच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात विविध परंपरा जोपासल्या जात असतात, पण त्याबाबत फारसं कोणाला ठाऊक नसतं. 'बकाल' या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना विदर्भातील एका अनोख्या परंपरेचं दर्शन घडणार आहे.

अनोख्या परंपरेचं दर्शन घडवणार 'बकाल'मधील 'घेऊन जा गे मारबत...'
SHARE

देशभरातच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात विविध परंपरा जोपासल्या जात असतात, पण त्याबाबत फारसं कोणाला ठाऊक नसतं. 'बकाल' या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना विदर्भातील एका अनोख्या परंपरेचं दर्शन घडणार आहे.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला, होळी आदी सणांवरील पारंपारिक ठेक्यावरील अनेक गाणी चित्रपटांतून झळकली आणि अजरामर झाली. आजही या सणांवरील गाणी आणि उत्सवाला अनुसरून अनेक चित्रपट येतात आणि ते कायम लक्षात राहतात. कारण, त्या त्या सणावेळी ती गाणी सर्वत्र वाजवली जातात. पण, विदर्भाचं सांस्कृतिक वैभव समजलं जाणाऱ्या १३९ वर्षे जुन्या मारबत परंपरेवर एकही आरती अथवा गाणं प्रचलित नाही. चित्रपटांमधूनही त्याची दखल कधी घेतली गेली नाही. 

समीर आठल्ये दिग्दर्शित आणि राजकुमार मेन्डा निर्मित आगामी 'बकाल' या चित्रपटानं मात्र मारबत या अनोख्या व जगाला अज्ञात असलेल्या धार्मिक आणि प्रचंड उर्जेनं मोठ्या संख्येनं साजरा होणाऱ्या उत्सवाची दखल घेतली आहे. चित्रपटात 'घेऊन जा गे मारबत...' हे मारबत मिरवणुकीतील गाणं नुकतेच प्रदर्शित झालं आहे. मारबत उत्सवाला वाहिलेलं हे पहिलं वहिलं संगीतपुष्प असल्यानं विदर्भातील ही प्राचीन परंपरा या वर्षी अधिक उत्साहात साजरी होणार आहे. त्याचबरोबर या गाण्यात जगाला मारबत परंपरेचं दर्शनही घडणार आहे.   

विदर्भाचं सांस्कृतिक वैभव समजली जाणारी आणि मागील अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीनं तान्हा पोळ्याला निघणाऱ्या काळी आणि पिवळी मारबत आणि बडगे मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत. काळ्या मारबतीला १३९ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३५ वर्षांचा इतिहास असून, दोन्ही मारबती एकाचवेळी निघत असतात. समाजातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याचं आवाहन करणारी ही मिरवणूक तान्हा पोळ्याच्या दिवशी निघते. दरवर्षी भ्रष्टाचार, दहशतवाद, शहरातील समस्या किंवा अनैतिक प्रवृत्ती आदी विषयांवर बडगे काढले जातात. या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली जाते. विविध भागात बडगे आणि मारबती तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याची पुजा अर्चा आणि नवस केले जातात. नागपूरातील विविध भागातील मंडळांकडून बडग्यांच्या मूर्ती तयार केल्या जातात.

'बकाल' या चित्रपटाची पार्श्वभूमी मारबत परंपरेच्या मूळ संकल्पनेशी निगडीत आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचं आणि प्रवृत्तीचं उच्चाटन करण्याचं आवाहन करणारी ही परंपरा आहे. 'घेऊन जा गे मारबत...' या गाण्याचं संगीत प्रकाशन महाराष्ट्राचे उर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनराई फाऊंडेशनचे गिरीश गांधी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल तसेच मारबत उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. हे गीत सुरेंद्र मसराम यांनी लिहिलं असून, संगीत मोरेश्वर -निस्ताने यांनी संगीतबद्ध केलं आहे. आदर्श शिंदे आणि धनश्री देशपांडे यांनी हे गाणं गायलं आहे. अलका कुबल, यतीन कार्येकर आणि चैतन्य मेस्त्री आदी कलावंतानी या गाण्यात अभिनय केला आहे. 

लिंक - https://www.youtube.com/watch?v=tSptXuZ6QZI&feature=youtu.beहेही वाचा  -

‘सांड की आंख’चा वेध घेणार तापसी-भूमी

महेशचं देवेंद्रला 'दबंग' गिफ्ट
संबंधित विषय
ताज्या बातम्या