Advertisement

‘सांड की आंख’चा वेध घेणार तापसी-भूमी

अलीकडच्या काळात बायोपीकचं पीक प्रचंड वाढलं आहे. त्यामुळं रिअल लाईफमधील नायक-नायिकांना चंदेरी दुनियेचं ग्लॅमर प्राप्त होत आहे. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांची भूमिका असलेल्या ‘सांड की आंख’ या चित्रपटातही दोन खऱ्याखुऱ्या जिद्दी स्त्रियांची स्टोरी पहायला

‘सांड की आंख’चा वेध घेणार तापसी-भूमी
SHARES

अलीकडच्या काळात बायोपीकचं पीक प्रचंड वाढलं आहे. त्यामुळं रिअल लाईफमधील नायक-नायिकांना चंदेरी दुनियेचं ग्लॅमर प्राप्त होत आहे. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांची भूमिका असलेल्या ‘सांड की आंख’ या चित्रपटातही दोन खऱ्याखुऱ्या जिद्दी स्त्रियांची स्टोरी पहायला मिळणार आहे.

शूटर्स स्त्रियांची कथा 

भारत हा केवळ संस्कृतीप्रधान देश नसून, इथं खेळालाही अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. त्यामुळं इथं संस्कृतीचे रक्षकही बनतात आणि मैदानावर पराक्रम गाजवणारे खेळाडूही घडतात. कबड्डीपासून कुस्तीपर्यंत आणि बँडमिटनपासून क्रिकेटपर्यंत इथं प्रत्येक भारतीय कोणत्या ना कोणत्या खेळाचा चाहता आहे. खेळाडू आणि चाहत्यांच्या या नात्यामुळंच काही भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा नावलौकीक मिळवला आहे. ‘सांड की आंख’ हा सिनेमा खेड्यात राहणाऱ्या शूटर्स स्त्रियांची कथा सांगणारा आहे.


शार्प शूटर वृद्धा 

आजवर बऱ्याच भारतीय स्त्रियांनी आपल्या शूटिंग कलेनं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचं काम केलं आहे, पण या चित्रपटात अशा दोन स्त्रियांची कथा पहायला मिळणार आहे, ज्यांनी ६० वर्षे वयानंतर शार्प शूटरची पदवी आपल्या नावे केली आहे. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या दोन वयोवृद्ध स्त्रियांनी गाजवलेला हा पराक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे. खरं तर ‘सांड की आंख’ हा शार्प शूटर्सवर बनणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. यात तापसी आणि भूमी यांनी चंद्रो आणि प्रकाशी यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.


घरी राहण्याचा योग 

नॅशनल स्पोर्टस डेचं औचित्य साधत तापसी आणि भूमी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत ‘सांड की आंख’मध्ये काम करण्याचा अनुभवही शेअर केला. प्रकाशी तोमरची भूमिका साकारलेली तापसी म्हणाली की, अनंत अडचणींवर मात करत उतरत्या वयात बंदूक हाती घेत एक नवा अध्याय लिहिणाऱ्या स्त्रिची व्यक्तिरेखा साकारणं खूपच प्रेरणादायी होतं. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहण्याचा योग जुळून आला. तिथं पाहिलं की दोघीही कायम शार्प शूटिंगच्या खेळाला प्रोत्साहन देत असतात. एका खेड्यातील असूनही मुद्दा जेव्हा खेळाचा असतो, तेव्हा भारतीय स्त्रियांची इच्छाशक्ती अधिक प्रबळ होते हे त्यांच्याकडून समजलं.


अंगावर रोमांच उभे 

तापसीप्रमाणं भूमीनंही आपलं मनोगत व्यक्त केलं. ती म्हणाली की, शार्प शूटिंग हा खूप रोमांचक खेळ आहे. चंद्रो तोमर यांची भूमिका साकारताना मला या खेळाबाबत बरंच काही शिकता आलं. मेरठमधील त्या गावातील गावकऱ्यांशी मी खूप बोलले. शार्प शूटिंगबाबत तिथले लोक इतके पॅशनेट का असल्याचं त्यातून जाणवलं. ते या खेळात तरबेज आहेत. त्यांची मेहनत आणि जिद्द पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. या चित्रपटात मी साकारलेली व्यक्तिरेखा पाहून आणखी खेळाडू घडण्यास मदत होईल, असा विश्वासही भूमीनं व्यक्त केला आहे. तुषार हिरानंदानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात प्रकाश झा आणि विनीत कुमार यांच्याही भूमिका आहेत.हेही वाचा -

'कारगिल गर्ल' बनली जान्हवी

अभिजीत कोसंबीनं गायली 'तेली गल्लीचा राजा'ची महती
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा