अभिजीत कोसंबीनं गायली 'तेली गल्लीचा राजा'ची महती


  • अभिजीत कोसंबीनं गायली 'तेली गल्लीचा राजा'ची महती
SHARE

अलीकडच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाची महती सांगणाऱ्या गीतांचा ट्रेंड सुरू आहे. याच ट्रेंडमध्ये सहभागी होत गायक अभिजीत कोसंबीनं तेली गल्लीच्या राजाची महती वर्णली आहे.


व्हिडीओ साँग

प्रत्येक विभागाच्या गणपतीचं खास वैशिष्ट्य असतं. असाच एक गणपती म्हणजे तेली गल्लीचा राजा. तेली गल्लीचा राजा नवसाला पावतो याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आपल्या या गणपती बाप्पाची अर्थात राजाची महती सांगणारं गाणं 'तेली गल्लीचा राजा, आराध्य माझा...' नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. मेघना दळवी यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या शब्दांना गायक अभिजीत कोसंबीनं आवाज दिला आहे. जयदीप फिल्म्स प्रॉडक्शननं या व्हिडीओ साँगची निर्मिती केली आहे. 


गाणं लाँच

मुंबईतील दि लीला हॉटेलमध्ये हे गाणं मोठ्या थाटात लाँच करण्यात आलं. यावेळी मनोहर जोशी, खासदार विनायक राऊत, दि लीला हॉटेलचे प्रेसिडेंट विनोद देसाई, शिवसेना सेक्रेटरी संजय राणे, गायक अभिजीत कोसंबी, गीतकार मेघना दळवी, निर्माते रंगनाथ पाचंगे, अभिनेते अरुण नलावडे, संगीतकार अमर देसाई, कोरिओग्राफर संतोश भांबरे कार्यकारी निर्माते संभाजी कांबळे निर्मिती व्यवस्थापक धनंजय गारळे आदी मान्यवर उपस्थित होते. या गाण्याच्या शब्दांचा, संगीताचा आणि सुरेल आवाजाचा आनंद प्रत्येक गणेश भक्ताला घेता येणार असून, या गाण्यातून तेली गल्लीचा राजाची महती सर्वदूर पोहोचणार आहे.हेही वाचा -

पुन्हा शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर

'विष'मधून अभिनयात एंट्री करणार जसलीन मठरु
संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ