Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

'विष'मधून अभिनयात एंट्री करणार जसलीन मठरु

बिग बॉस १२ च्या घरातील सदस्य असलेली जसलीन मठरू सर्वांना चांगलीच परिचयाची झाली आहे. हीच जसलीन आता 'विष' या आगामी टीव्ही शोच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण करणार आहे.

'विष'मधून अभिनयात एंट्री करणार जसलीन मठरु
SHARE

बिग बॉस १२ च्या घरातील सदस्य असलेली जसलीन मठरू सर्वांना चांगलीच परिचयाची झाली आहे. हीच जसलीन आता 'विष' या आगामी टीव्ही शोच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण करणार आहे.


नशीब आजमावण्यास सज्ज

जसलीन मठरू हे नाव भविष्यात जेव्हा जेव्हा उच्चारलं जाईल, तेव्हा तेव्हा त्यासोबत गायक अनुप जलोटा यांचाही नावाचा उल्लेख होणार आहे. बिग बॉस १२ मध्ये जसलीनचं नाव अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड म्हणून जोडलं गेलं होतं. शोमध्येही त्यांनी तसं भासवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर मात्र नकार दिला. ही तीच जसलीन आहे, जी आता अभिनयात आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. अनुप जलोटांच्या प्रसिद्धी वलयाचा फायदा उठवणारी जसलीन आता खऱ्या अर्थानं स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करताना दिसणार आहे.


जसलीनचं नवं रूप 

गायिका आणि मॉडेलसोबतच अभिनेत्री म्हणूनही आता जसलीनचा उल्लेख केला जाणार आहे. कलर्स वाहिनीवरील 'विष' या मालिकेद्वारे जसलीनचं नवं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक नाट्यमय वळणांसोबत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी होत असलेल्या या मालिकेत सना मकबूल खान साकारत असलेली आलिया आणि सबरीनाच्या रूपातील डेबिना बॅनर्जी यांच्यातील शक्तीच्या कथा दाखवल्या जात आहेत. प्रत्येक प्रत्येक एपिसोडगणिक दोघींमधील लढाई अधिक तीव्र होत चालली आहे. या मालिकेतील नाट्य आणखी रोमांचक करण्यासाठी आता जसलीनची एंट्री होणार आहे.


जलक्षिणीच्या रुपात 

जसलीन या मालिकेत पाण्याची राणी - जलक्षिणीच्या रुपात दिसणार आहे. बिग बॉसमधील साहसानंतर आता जसलीन एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या नव्या साहसासाठी तयार झाली आहे. सध्या चालू असलेल्या ट्रॅकनुसार, सबरीना आलियाला मारण्यासाठी सातत्यानं ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे. आदित्यसाठी ती सातत्यानं दुष्ट योजना आखत आहे. आपली योजना यशस्वी करण्यासाठी आणि आलिया व आदित्य यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी ती पाण्याची राणी असलेल्या जलक्षिणीला आदित्यला वश करून आलियाला ठार करण्याची आज्ञा देत असल्याचं मालिकेत पहायला मिळणार आहे.


क्लिष्ट व्यक्तिरेखा

अभिनयातील पदार्पणाविषयी जसलीन खूप उत्सुक आहे. याबाबत ती म्हणाली की, माझं कलर्ससोबतचं बाँडींग खूप छान आणि यशस्वी ठरलं आहे. मागील वर्षी बिग बॉस १२ पासून मी माझा टेलिव्हिजनवरील प्रवास सुरू केला होता. आता 'विष'मधून अभिनेत्री म्हणून पदार्पण करताना पुन्हा एकदा कलर्ससोबत काम करत असल्याचाही आनंद होत आहे. या संधीमुळं माझ्या अनुभवात नक्कीच आणखी भर पडेल. काहीशी क्लिष्ट व्यक्तिरेखा असलेल्या जलक्षिणीची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल असा विश्वासही जलसीननं व्यक्त केला आहे.हेही वाचा  -

ईशान-अनन्याची जमली जोडी

मांडवामध्ये 'बोले चुडिया'च्या सेटवर नवाजुद्दीन-कबीर भेट
संबंधित विषय
संबंधित बातम्या