Advertisement

मांडवामध्ये 'बोले चुडिया'च्या सेटवर नवाजुद्दीन-कबीर भेट

नवाजुद्दीन सिद्दीकी आज इतका मोठा अभिनेता बनला आहे की काही कलाकार त्याच्यासोबत काम करणं हे आपलं भाग्य मानू लागले आहेत. आता 'बोले चुडिया' या आगामी चित्रपटात नवाजुद्दीनसोबत कबीर दुहन सिंग दिसणार आहे.

मांडवामध्ये 'बोले चुडिया'च्या सेटवर नवाजुद्दीन-कबीर भेट
SHARES

नवाजुद्दीन सिद्दीकी आज इतका मोठा अभिनेता बनला आहे की काही कलाकार त्याच्यासोबत काम करणं हे  आपलं भाग्य मानू लागले आहेत. आता 'बोले चुडिया' या आगामी चित्रपटात नवाजुद्दीनसोबत कबीर दुहन सिंग दिसणार आहे.


वेगळं रूप 

नवाजुद्दीन एका मागोमाग एक जबरदस्त सिनेमांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. निर्माते-दिग्दर्शकही त्याला वेगवेगळ्या रूपात सादर करत प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के देत आहेत. 'बोले चुडिया' या आगामी चित्रपटातही प्रेक्षकांना नवाजुद्दीनचं एक वेगळं रूप पहायला मिळणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनची जोडी तमन्ना भाटियासोबत जमली आहे. याशिवाय कबीर दुहन सिंग याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवा बऱ्याच दिवसांनी राजपाल यादव या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.


शूटिंगला सुरूवात

अशी धडाकेबाज टीम असलेल्या 'बोले चुडीया' या चित्रपटाचं शूटिंग सध्या राजस्थानमधील मांडवा येथील हेरिटेज रिसॉर्टमध्ये सुरू आहे. नवाजुद्दीनसह तमन्ना, कबीर आणि राजपाल हे तिघेही शूटिंगमध्ये चांगलेच बिझी आहेत. १ ऑगस्टपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली असून, तब्बल ४५  दिवसांचं सलग शूटिंग शेडूल येथे पार पडणार आहे. शूटिंग करताना कामासोबत कलाकार सेटवर खूप मजा मस्तीही सुरू आहे. कास्ट आणि मेकर्सच्या सोशल मीडियावर या सर्व गोष्टींची झलक पहायला मिळत आहे.


आनंदाचे क्षण

अलीकडेच सोशल मीडियावर नवाजुद्दीनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो झोपाळ्यावर बसून झोके घेत असल्याचं दिसून आलं. फोटोला कॅप्शन देण्यात आलं होतं की, आनंदाचे क्षण - लहानपणापासून जीवन जगणारे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्विमिंग पूलशेजारी मुख्य कलाकार गाण्याच्या शूटिंग मध्ये व्यग्र असल्याचं दिसत होतं.हेही वाचा  -

'मोलकरीण बाई'मध्येही साजरा होणार गणेशोत्सव

'व्हीआयपी गाढव'मध्ये भाऊसोबत शीतल
संबंधित विषय
Advertisement