Advertisement

'व्हीआयपी गाढव'मध्ये भाऊसोबत शीतल

मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी अल्पावधीतच लक्ष वेधून घेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक असलेली शीतल अहिरराव आता भाऊ कदमसोबत दिसणार आहे.

'व्हीआयपी गाढव'मध्ये भाऊसोबत शीतल
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी अल्पावधीतच लक्ष वेधून घेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक असलेली शीतल अहिरराव आता भाऊ कदमसोबत दिसणार आहे.


नवरा-बायकोच्या भूमिकेत

शीतलबाबत सांगायचं तर तिनं यापूर्वी 'H2O कहाणी थेंबाची' मध्ये साकारलेली सियानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. याखेरीज शीलतनं 'जलसा', 'मोल, 'फक्त एकदाच', 'होरा', 'सलमान सोसायटी' या चित्रपटांसोबत 'वॉक तुरु तुरु', ल'ई भारी पोरी', 'इश्काचा किडा' या धमाल म्युझिक अल्बम्समध्येही काम केलं आहे. आता विनोदवीर भाऊ कदमसोबत शीतलच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. 'व्हीआयपी गाढव' या आगामी मराठी चित्रपटात शीतल आणि भाऊ यांची जोडी जमल्याचं पहायला मिळणार आहे. या चित्रपटात दोघेही नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. भाऊ कदमसारख्या मातब्बर कलाकारासमवेत काम करताना शीतलच्या अभिनयाचा चांगलाच कस लागला आहे. नेहमी हलक्या फुलक्या भूमिकांमध्ये दिसलेली शीतल पहिल्यांदाच एका गावरान स्त्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांना हसवणार आहे.

१३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित

संजय पाटील दिग्दर्शित 'व्हीआयपी गाढव' हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शीतल-भाऊसोबत विजय पाटकर आणि  भारत गणेशपुरे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. 'H2O कहाणी थेंबाची' या पाण्यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या सामाजिक चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं सर्व स्तरांतून कौतुक झालं असून, मराठी मनोरंजनक्षेत्रातल्या या नव्या उभरत्या ताऱ्याला प्रेक्षकांचीही पसंतीची पावती लाभली आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखेबाबत शीतल म्हणाली की, विनोदी भूमिका वठवणं भल्या-भल्या कलाकारांना कठीण जातं. त्यात हा माझा प्रांत नाही. अशातच कॉमेडी किंग भाऊ माझ्यासमोर असल्यानं माझ्यावर थोडंसं दडपण होतं, पण भाऊंनी सांभाळून घेतलं. काशी ही भूमिका माझ्यासाठी कायम स्मरणात राहावी अशीच आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी मला मॉर्डन रूपात पाहिलं आहे, पण आता त्यांना गावरान ठेका पाहायला मिळेल.



हेही वाचा -

दशकानंतर संजय-मनिषा पुन्हा एकत्र

आयुष्मान-रितेशला लागली दादा कोंडकेंच्या ‘ढगाची कळ…’

ईद २०२० ला अक्षय फोडणार ‘लक्ष्मी बाॅम्ब’




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा