Advertisement

दशकानंतर संजय-मनिषा पुन्हा एकत्र

काही कलाकार बरेच चित्रपट एकत्र करतात, पण नंतर अचानक एकमेकांपासून दुरावले जातात. त्यामुळं बऱ्याच कालावधीनंतर ते जेव्हा पुन्हा एकत्र येतात, तेव्हा त्या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढते. संजय दत्त आणि मनीषा कोईराला जवळजवळ एक दशकानंतर एकत्र दिसणार आहेत.

दशकानंतर संजय-मनिषा पुन्हा एकत्र
SHARES

काही कलाकार बरेच चित्रपट एकत्र करतात, पण नंतर अचानक एकमेकांपासून दुरावले जातात. त्यामुळं बऱ्याच कालावधीनंतर ते जेव्हा पुन्हा एकत्र येतात, तेव्हा त्या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढते. संजय दत्त आणि मनिषा कोईराला जवळजवळ एक दशकानंतर एकत्र दिसणार आहेत.


मान्यता दत्तची निर्मिती 

अलिकडच्या काळात संजय दत्त एकापेक्षा एक दमदार सिनेमांमध्ये मध्यवर्ती भूमिकांमध्ये लक्ष वेधून घेत आहे. कथी सकारात्मक तर कधी नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या संजयचा 'प्रस्थानम' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवत आहेत. या चित्रपटात संजयसोबत जॅकी श्रॅाफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याखेरीज संजयची एके काळची अॅानस्क्रीन नायिका असलेली मनीषा कोईरालाही या चित्रपटात आहे. या चित्रपटाची निर्मिती संजयची पत्नी मान्यता दत्तनं केली आहे.


दक्षिणात्य सिनेमाचा रिमेक 

२० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात चंकी पांडे, अमायरा दस्तूर, सत्यजीत दुबे आणि अली फजल यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 'प्रस्थानम' शीर्षक असलेल्या दक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हिंदीतही त्याच शीर्षकानं प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन फरहाद सामजी यांनी केलं आहे. जवळजवळ नऊ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मूळ सिनेमात काळानुरूप काही बदल करण्यात आले आहे. काळाप्रमाणे या चित्रपटाचं कथानकही अपग्रेड करण्यात आलं आहे. मूळ सिनेमातील व्यक्तिरेखा मात्र तशाच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळं दक्षिणात्य चित्रपट प्रेमींनाही या चित्रपटाबाबत आकर्षण नक्कीच असणार.


जॅकीचा वेगळा अंदाज

संजय-मनिषा यांच्याबद्दल बोलायचं तर यापूर्वी २००८ मध्ये दोघांनी 'मेहबूबा' या चित्रपटात स्क्रीन शेअर केला होता. त्यामुळं संजय-मनीषा यांच्या चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकारांना पुन्हा एकत्र पाहण्याची संधी 'प्रस्थानम'मुळं लाभणार आहे. या चित्रपटात जॅकी प्रामाणिक गार्डच्या रूपात परिवाराचं रक्षण करताना दिसणार असून, त्याचा एक वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे. देव कट्टा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.हेही वाचा -

आयुष्मान-रितेशला लागली दादा कोंडकेंच्या ‘ढगाची कळ…’

ईद २०२० ला अक्षय फोडणार ‘लक्ष्मी बाॅम्ब’संबंधित विषय
Advertisement