Advertisement

ईद २०२० ला अक्षय फोडणार ‘लक्ष्मी बाॅम्ब’

सणासुदीला मोठे सिनेमे प्रदर्शित करून रसिकांचा आनंद कॅश करण्याची फार मोठी परंपरा हिंदी सिनेसृष्टीत आहे. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत पुढल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर अक्षय कुमार ‘लक्ष्मी बाम्ब’ फोडणार आहे.

ईद २०२० ला अक्षय फोडणार ‘लक्ष्मी बाॅम्ब’
SHARES

सणासुदीला मोठे सिनेमे प्रदर्शित करून रसिकांचा आनंद कॅश करण्याची फार मोठी परंपरा हिंदी सिनेसृष्टीत आहे. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत पुढल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर अक्षय कुमार ‘लक्ष्मी बाॅम्ब’ फोडणार आहे.


बाॅक्स आॅफिसवर धमाल

२६ जानेवारी, १५ आॅगस्ट, ईद, दिवाळी, खिसमस हे दिवस सिनेसृष्टीच्या दृष्टिकोनातून खास मानले जातात. सणांच्या या दिवशी एखादा मोठा सिनेमा प्रदर्शित करून रसिकांचा आनंद द्विगुणीत करायचा आणि चांगली कमाईही करायची हे यामागील खरं गणित आहे. आजवर हिंदी सिनेसृष्टीतील बऱ्याच आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे सण कॅश करत बाॅक्स आॅफिसवर धमाल उडवून दिली आहे. यंदाच्या ईदला सलमान खानच्या ‘भारत’नं तिकीटबारीवर आपलं नाव कोरल्यानंतर पुढल्या ईदला ‘लक्ष्मी बाॅम्ब’ हा हिंदी सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.


२२ मे २०२० ला प्रदर्शित

यंदा जून महिन्यात आलेली ईद पुढल्या वर्षी मे महिन्यात येणार आहे. हेच औचित्य साधत २२ मे २०२० रोजी ‘लक्ष्मी बाॅम्ब’ प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील अक्षयचा लुक रिव्हील झाल्यापासूनच सर्वांना या चित्रपटाचे वेध लागले आहेत. फर्स्ट लुक पोस्टरमध्ये अक्षय डोळ्यांना काजळ लावताना दिसल्यानं या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. हे पोस्टर शेअर करताना अक्षयनं ‘लक्ष्मी बाम्ब’ जून २०२० मध्ये रिलीज होणार असल्याचं घोषित केलं होतं, पण आता ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रसिक दरबारी सादर करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.


तृतीयपंथीयाच्या भूमिकेत अमिताभ

या चित्रपटात अक्षयसोबत अमिताभ बच्चन तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांखेरीज तुषार कपूर आणि आर. माधवन यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. खरं तर हा चित्रपट म्हणजे तमिळ भाषेत गाजलेल्या ‘कंचना’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तमिळ चित्रपटाचं दिग्दर्शन लाँरेंस राघव यांनी केलं होतं आणि हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही त्यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे. या चित्रपटात टायटल रोलमध्ये म्हणजेच लक्ष्मीच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहेत. फरहाद सामजी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून, अक्षयसह शबीना खान आणि तुषार कपूर या चित्रपटाचे निर्माते आहेत.हेही वाचा -

अनिश गोरेगावकरनं केलं 'एक टप्पा आऊट'

शिवानी सुर्वेची डबल गुड न्यूज

'राजकुमार' करणार इतिहासाची पुनरावृत्ती!
संबंधित विषय
Advertisement