Advertisement

'राजकुमार' करणार इतिहासाची पुनरावृत्ती!

काही कलाकार जोड्यांच्या रूपात पॅाप्युलर झाल्याचं आपण नेहमीच पाहतो. 'राजकुमार' हा आगामी मराठॅ चित्रपटही अशीच एक जोडी पुन्हा नव्यानं रसिकांसमोर घेऊन येत इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहे.

'राजकुमार' करणार इतिहासाची पुनरावृत्ती!
SHARES

काही कलाकार जोड्यांच्या रूपात पॅाप्युलर झाल्याचं आपण नेहमीच पाहतो. 'राजकुमार' हा आगामी मराठी चित्रपटही अशीच एक जोडी पुन्हा नव्यानं रसिकांसमोर घेऊन येत इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहे.


बबन-कोमल पुन्हा एकत्र

राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' हा मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट सर्वांना आठवत असेलच. गीत-संगीतासोबतच चांगली वनलाईन असल्यानं या चित्रपटानं रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटातील संवाद, गाणी, कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. बबन आणि कोमल या आॅनस्क्रीन जोडीनं प्रेक्षकांना प्रेमात पडलं होतं. 'बबन'मधली हीच बहुचर्चित जोडी 'राजकुमार' या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


नव्या रूपात, नव्या ढंगात 

'बबन'मध्ये मुख्य भूमिकेतील जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एका नव्या रूपात, नव्या ढंगात सज्ज झाली आहे. भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव या जोडीनं 'बबन' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आता हीच जोडी 'राजकुमार'मध्येही झळकणार आहे. त्यांच्या जोडीला अर्चना जॉईस हिचीही भूमिका आहे. नुकतीच  'राजकुमार' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'राजकुमार' या चित्रपटाचं दुसरं मुख्य वैशिट्य म्हणजे  २०१८ मध्ये 'के.जी.एफ.', 'मुळशी पॅटर्न' आणि 'नाळ' या चित्रपटांमधील अर्चना जॉईस, प्रवीण तरडे, देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोकळे हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


दिग्दर्शन समर्थ राज इडिगांचं

एस. आर. एफ. प्रोडक्शन प्रस्तुत 'राजकुमार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केलं आहे. समर्थ यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पहिलं आहे. 'राजकुमार' हा समर्थ राज इडिगा यांचा पहिलाच चित्रपट आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करूनही समर्थ यांनी पहिल्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी मराठी चित्रपटाची निवड केली आहे. अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेल्या समर्थ यांनी आवडीमुळे आणि इच्छेमुळे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. समर्थ यांच्या या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबत ते अद्याप रिव्हील करण्यात आलेलं नाही.



हेही वाचा  -

हिंदीतील दिग्गजांना मराठीची मोहिनी 

मराठी चित्रपटात दिसणार सलमान!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा