मराठी चित्रपटात दिसणार सलमान!

मराठी चित्रपटांच्या पटलावर आता सलमान अवतरणार आहे. तोसुद्धा मुख्य भूमिकेत. ‘सातारचा सलमान’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना सलमानचं मराठमोळं रूप पहायला मिळणार आहे.

  • मराठी चित्रपटात दिसणार सलमान!
SHARE

मराठी चित्रपटांच्या पटलावर आता सलमान अवतरणार आहे. तोसुद्धा मुख्य भूमिकेत. ‘सातारचा सलमान’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना सलमानचं मराठमोळं रूप पहायला मिळणार आहे. 

शीर्षक वाचून झालात ना चकीत… लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चित्रपटसृष्टीच्या जादुई दुनियेची भुरळ असते. सामान्य माणसं तर या झगमगत्या दुनियेला आणि त्यात वावरणाऱ्या कलाकारांना आपल्या रोजच्या जीवनाचाच एक भाग समजतात, काही तर आपला आदर्श मानतात. कलाकारांबद्दल एक वेगळ्याच प्रकारचं आकर्षण सर्वांमध्ये पाहायला मिळतं. अगदी नकळतपणं आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना विशिष्ट कलाकारांच्या नावाची ओळख देऊ लागतो. जसं, अहमदनगरचा अनिल कपूर, शहापूरचा शाहरुख, नाशिकचा नागार्जून, बदलापूरचा बच्चन, मालेगावची माधुरी, तसाच हा आहे सातारचा सलमान!

या चित्रपटाच्या शीर्षकात जरी सलमान असला तरी खराखुऱ्या सलमानचं याच्याशी काहीही देणं घेणं नाही. शीर्षक वाचून थोडा संभ्रम झाला असेल, पण तो वेळेतच दूर केलेला बरा. 'सातारचा सलमान' ही गोष्ट आहे एका छोट्या गावात राहणाऱ्या अमित काळभोर या सामान्य मुलाच्या स्वप्नांची आणि जिद्दीची. छोट्या गावात राहूनही मोठी स्वप्न पाहणारा अमित 'सातारचा सलमान' या सिनेमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.

 टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शनासोबतच या सिनेमाचं लेखनही हेमंतनंच केलं आहे. 'सातारचा सलमान' मधील 'सलमान' नक्की कोण असणार, याची उत्सुकता सर्वानाच होती. याबद्दल मागील अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लावले जात होते. मात्र अखेर यावरून पडदा हटवण्यात आला आहे. ‘गर्लफ्रेंड’, ‘बसस्टॉप’, ‘आम्ही बेफिकर’, ‘शेंटिमेंटल’, ‘कृतांत’ या चित्रपटांमधून समोर आलेल्या सुयोग गोऱ्हे यानं ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा  -

Movie Review : पोलीसरूपी माणसातील माणुसकीची कथा

Movie Review : खेड्यातील वास्तव दाखवणारी शर्यत
संबंधित विषय
ताज्या बातम्या