अनिश गोरेगावकरनं केलं 'एक टप्पा आऊट'

मागील बऱ्याच दिवसांपासून महाष्ट्रातील तमाम रसिकांना अक्षरश: पोट धरून हसवणाऱ्या 'एक टप्पा आऊट' या स्टँड अप कॅमोडी शोच्या महाअंतिम फेरीचा निकाल लागला आहे. या शोमध्ये अनिश गोरेगावकरनं महाविजेतेपदाचा मान पटकावला आहे.

  • अनिश गोरेगावकरनं केलं 'एक टप्पा आऊट'
  • अनिश गोरेगावकरनं केलं 'एक टप्पा आऊट'
SHARE

मागील बऱ्याच दिवसांपासून महाष्ट्रातील तमाम रसिकांना अक्षरश: पोट धरून हसवणाऱ्या 'एक टप्पा आऊट' या स्टँड अप काॅमेडी शोच्या महाअंतिम फेरीचा निकाल लागला आहे. या शोमध्ये अनिश गोरेगावकरनं महाविजेतेपदाचा मान पटकावला आहे.


आरती सोळंकीची टीम

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'एक टप्पा आऊट' या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात मालाडचा गोरेगावकर अर्थातच अनिश गोरेगावकरनं बाजी मारत 'एक टप्पा आऊट'चं विजेतेपद पटकावलं. उपविजेतेपदाचा मान लातूर पॅटर्न बालाजी आणि अमरावतीचा करामती प्रविण प्रभाकरनं पटकावला. खास बात म्हणजे ते तीनही स्पर्धक आरती सोळंकीच्या टीममधले होते. तिन्ही स्पर्धकांनी महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारल्यामुळं आरतीचा आनंद गगनात मावत नव्हता.


मेण्टॉरची जबाबदारी 

आपण तयार केलेल्या स्पर्धकांनी मिळवलेल्या यशाबद्दल आरती म्हणाली की, आजवर मी बऱ्याच स्पर्धांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले, पण 'एक टप्पा आऊट'मुळं पहिल्यांदाच यशाची चव चाखता आली. खरं तर आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. 'एक टप्पा आऊट'मध्ये मेण्टॉरची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी होतानाच फायनलमध्ये माझे स्पर्धक सहभागी होणारच असा ठाम निर्धार केला होता आणि त्यानुसार तयारी केली. माझ्या टीममधले सर्वच स्पर्धक मेहनती होते. माझा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. महाअंतिम स्पर्धेतले तीनही विजेते माझ्या टीममधले आहेत हे सांगताना खूप अभिमान वाटतो.


स्टार प्रवाहचा ऋणी

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना अनिशही भावूक झाला. स्टार प्रवाहचे खूप खूप आभार. त्यांनी दिलेल्या संधीमुळं मला ओळख मिळाली. माझं भाग्य समजतो की दिग्गजांसमोर परफॉर्म करण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. आरती सोळंकी यांच्यासोबतच अभिजीत चव्हाण, रेशम टिपणीस, विजय पटवर्धन या मेण्टॉर्सचंही मार्गदर्शन मिळालं. आता खऱ्या अर्थानं जबाबदारी वाढली आहे. आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण दिल्याबद्दल स्टार प्रवाहचा कायम ऋणी राहीन अशा शब्दात 'एक टप्पा आऊट'चा विजेता अनिश गोरेगावकरनं आपली भावना व्यक्त केली.



हेही वाचा -

शिवानी सुर्वेची डबल गुड न्यूज

'राजकुमार' करणार इतिहासाची पुनरावृत्ती!




संबंधित विषय
ताज्या बातम्या