Advertisement

शिवानी सुर्वेची डबल गुड न्यूज

'बिग बॅास'मध्ये जो आला तो लोकप्रिय झाला असं जणू या घराचं ब्रीदवाक्यच आहे. त्यामुळंच इथं आलेला प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत रहात असतो. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात चर्चेत आलेल्या शिवानी सुर्वेलाही याचा फायदा होताना दिसत आहे.

शिवानी सुर्वेची डबल गुड न्यूज
SHARES

'बिग बॅास'मध्ये जो आला तो लोकप्रिय झाला असं जणू या घराचं ब्रीदवाक्यच आहे. त्यामुळंच इथं आलेला प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत रहात असतो. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात चर्चेत आलेल्या शिवानी सुर्वेलाही याचा फायदा होताना दिसत आहे.


फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड

सध्या बिग बॉसच्या घरातली सर्वात स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी यंदाचं वर्ष करीयरचा टर्निंग पॉईंट ठरत आहे. बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांचीही लाडकी असलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड चालूच राहणार आहे. शिवानीनं गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीमध्ये बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो केला. आपल्या पहिल्याच रिएलिटी शोमधून शिवानीनं रसिकांची मनं जिंकली आहेत. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांवर जादू केल्यानंतर आता शिवानी सिनेरसिकांवरही मोहिनी घालणार आहे.   


दोन सिनेमे येणार

ऑक्टोबर महिन्यात महिन्यामध्ये शिवानीचे दोन मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. अंकुश चौधरीसोबतचा 'ट्रिपल सीट' आणि हेमंत ढोमे लिखीत-दिग्दर्शित 'सातारचा सलमान' हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यातच सिनेसरसिकांच्या भेटीला येत आहेत. शिवानीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच डबल गुड न्यूज आहे.  २०१६ मध्ये शिवानीचा घंटा हा सिनेमा आला होता. त्यानंतर तीन वर्षांच्या गॅपनंतर ती रूपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. ११ ऑक्टोबरला शिवानीचा 'सातारचा सलमान', तर २४  ऑक्टोबरला 'ट्रिपल सीट' हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसच्या घरातून ब्रेक घेऊन काही काळासाठी घरी परतलेल्या शिवानीला आणखी दोन मोठ्या फिल्ममेकर्सकडूनही सिनेमाच्या ऑफर्स आल्या आहेत.हेही वाचा  -

हिंदीतील दिग्गजांना मराठीची मोहिनी 

मराठी चित्रपटात दिसणार सलमान!संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा