Advertisement

आयुष्मान-रितेशला लागली दादा कोंडकेंच्या ‘ढगाची कळ…’

ओरीजनलचा जमाना मागे पडला असून, रिमिक्सचं युगही सरलं आहे. सध्या ट्रेंड आहे रिक्रिएटेड साँगचा. या ट्रेंडमध्ये दादा कोंडकेंच्या ‘ढगाला लागली कळ…’ या गाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीवर मोहिनी घातली आहे.

आयुष्मान-रितेशला लागली दादा कोंडकेंच्या ‘ढगाची कळ…’
SHARES

ओरीजनलचा जमाना मागे पडला असून, रिमिक्सचं युगही सरलं आहे. सध्या ट्रेंड आहे रिक्रिएटेड साँगचा. या ट्रेंडमध्ये दादा कोंडकेंच्या ‘ढगाला लागली कळ…’ या गाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीवर मोहिनी घातली आहे.

काळानुरूप बदल

जुन्या गाण्यांमध्ये काळानुरूप बदल करत नव्या ट्रेंडनुसार सादर करण्याचा अजचा जमाना आहे. त्यामुळं बरीच गाजलेली गाणी नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येत आहेत. यामुळं एक पाझीटिव्ह गोष्ट घडत आहे. आजच्या पिढीनंही जुन्या गाण्यांच्या तालावर ठेका धरायला सुरूवात केली आहे. यामध्ये आता हिंदी गाण्यांना प्रादेषिक भाषांमधील गीतांचाही तडका दिला जात आहे. याच प्रक्रियेत दादा कोंडकेंचं गाजलेलं ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं…’ हे गाणं रसिकांच्या भेटीला येत आहे.

गाण्यांचं एक वेगळंच गणित

‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ हा दादा कोंडकेंच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे. दादा आणि त्यांच्या चित्रपटांच्या गाण्यांचं एक वेगळंच गणित होतं, जे प्रेक्षकांना आपल्या ठेक्यावर ताल धरायला लावायचं. ‘वर ढगाला लागली कळ…’ हे गाणंही त्यापैकीच एक आहे. आता हे गाणं अमराठी प्रेक्षकांनाहीही ताल धरायला लावणार आहेत. आयुष्मान खुराना सध्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटामुळं चर्चेत आहे. याच चित्रपटात दादांचं हे गाणं पहायला मिळणार आहे.

रिक्रिएटेड रूपात प्रेक्षकांच्या भेटीला 

‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या मराठी चित्रपटात ‘ढगाला लागली कळ…’ हे गाणं दादा आणि उषा चव्हाण यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं रिक्रिएटेड रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आणलं जाणार आहे. दिग्दर्शक राज शाडील्य यांनी ‘ड्रीम गर्ल’चं दिग्दर्शन केलं असलं तरी या गाण्याचा समावेश करण्याची कल्पना एकता कपूरची आहे. या गाण्यात आयुष्मानच्या जोडीला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही झळकणार आहे. या चित्रपटासोबतच आयुष्मान सध्या ‘बाला’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ आणि ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटांमुळे लाइमलाईटमध्ये आहे. ‘ड्रीम गर्ल’मध्ये तो एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे, पण त्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा