'मोलकरीण बाई'मध्येही साजरा होणार गणेशोत्सव

मालिका आणि सणांचं नातं अतूट असतं. त्यामुळंच वास्तवात येणाऱ्या सणांच्या दिवशी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही सण साजरे होताना दिसत असतात. आता 'मोलकरीण बाई' या मालिकेत गणेशोत्सव साजरा होणार आहे.

  • 'मोलकरीण बाई'मध्येही साजरा होणार गणेशोत्सव
  • 'मोलकरीण बाई'मध्येही साजरा होणार गणेशोत्सव
  • 'मोलकरीण बाई'मध्येही साजरा होणार गणेशोत्सव
SHARE

मालिका आणि सणांचं नातं अतूट असतं. त्यामुळंच वास्तवात येणाऱ्या सणांच्या दिवशी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही सण साजरे होताना दिसत असतात. आता 'मोलकरीण बाई' या मालिकेत गणेशोत्सव साजरा होणार आहे.


गणरायाचं जल्लोषात स्वागत

गणरायाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी सारा आसमंत आतूर आहे. सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठाही खुलल्या आहेत. दहा दिवसांचा हा उत्सव वर्षभराची ऊर्जा देऊन जातो. स्टार प्रवाहवरील 'मोलकरीण बाई' या मालिकेतल्या शांती नगर वस्तीमध्येही गणरायाचं जल्लोषात स्वागत होणार आहे. साग्रसंगीत पूजा, आरती आणि गोडाधोडाच्या मेजवानीसोबतच जबरदस्त नृत्याची मैफल या सोहळ्यात अनोखे रंग भरणार आहे. एकीकडे अनिता आणि अनिल, तर दुसरीकडे गुंजन आणि हृतिकचा डान्स धमाका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.


महाएपिसोडसाठी जय्यत तयारी

मोलकरीण बाई' या मालिकेत गुंजनची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी कासार आणि संपूर्ण टीमनं या विशेष भागासाठी खास तयारी केली होती. अश्विनी नृत्य शिकली असली तरी मालिकेत नृत्य करणं हा वेगळा अनुभव असल्याचं तिनं सांगितलं. याबाबत ती म्हणाली की, जवळपास पाच दिवस सेटवर आम्ही सगळे सराव करत होतो. शूटिंगच्या वेळा सांभाळत महाएपिसोडसाठी जय्यत तयारी केली. ही सगळी धमाल प्रेक्षकांना गणपती विशेष महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.


बिल्डरच्या रुपात संकट

उत्साहाच्या या वातावरणात मात्र शांतीनगर वस्तीवर संघवी बिल्डरच्या रुपात संकट उभं ठाकणार आहे. शांतीनगरची जागा बळकावू पाहणारा संघवी बिल्डर ऐन गणेशोत्सवात शांतीनगर उद्ध्वस्त करायला आला आहे. विघ्नहर्ता गणेश शांतीनगरावरचं संकट परतावून लावेल का? संघवी बिल्डरचा मनसुबा उधळला जाईल का? याची उत्कंठावर्धक गोष्ट १ सप्टेंबरच्या गणपती विशेष भागात पाहायला मिळेल.हेही वाचा -

'व्हीआयपी गाढव'मध्ये भाऊसोबत शीतल

बोमन बनला क्रिकेटच्या मैदानावरील इंजीनियर
संबंधित विषय
ताज्या बातम्या