Advertisement

बोमन बनला क्रिकेटच्या मैदानावरील इंजीनियर

नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकावर भारतीय क्रिकेट संघानं आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं नसलं तरी, १९८३ मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाच्या स्मृती जागवणारा ‘८३’ नक्कीच सर्वांना त्या काळात घेऊन जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता बोमन ईराणीही दिसणार आहे.

बोमन बनला क्रिकेटच्या मैदानावरील इंजीनियर
SHARES

नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकावर भारतीय क्रिकेट संघानं आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं नसलं तरी, १९८३ मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाच्या स्मृती जागवणारा ‘८३’ नक्कीच सर्वांना त्या काळात घेऊन जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता बोमन ईराणीही दिसणार आहे.


क्रिकेटर्स रुपेरी पडद्यावर

‘८३’ या चित्रपटाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना त्यांचे आवडत्या क्रिकेटर्सना रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. १९८३ मध्ये विश्वचषक पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद कपिल देव यांनी भूषवलं होतं. कपिल यांच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग दिसणार असल्याचं एव्हाना सर्वानाच ठाऊक झालं आहे.  रणवीरची रिअल लाईफ पार्टनर दीपिका पदुकोण या चित्रपटात कपिल यांच्या पत्नीच्या म्हणजेच रोमी भाटीया यांच्या रूपात दिसणार आहे.  याखेरीज या चित्रपटात आणखीही बरेच क्रिकेटर चमकणार आहेत. यात क्रिकेटच्या मैदानावरील इंजीनियर म्हणजेच फारोख इंजीनियर यांची भूमिका बोमन साकारत आहे.


पुढल्या वर्षी प्रदर्शित

कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटासाठी वास्तवात विश्वचषकाच्या टीममध्ये सहभागी होत क्रिकेटच्या मैदानावर इतिहास रचलेल्या माजी क्रिकेटपटूंनी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना आपापली शैली शिकवली आहे. बोमनसुद्धा इंजीनियर यांची शैली आत्मसात करण्यासाठी खूप घाम गाळत आहे. बोमननं आजवर नेहमीच कोणत्याही व्यक्तिरेखांना अचूक न्याय दिला असल्यानं इंजीनियर यांची भूमिकाही तो अत्यंत सहजपणे साकारेल यात शंका नाही. या चित्रपटात ताहीर राज भसीन, साकीब सलीम, अमी विर्क, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील, हार्डी संधू, साहील खट्टर, पंकज त्रिपाठी, झाकीर हुसैन आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. पुढल्या वर्षी १० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

दशकानंतर संजय-मनिषा पुन्हा एकत्र

आयुष्मान-रितेशला लागली दादा कोंडकेंच्या ‘ढगाची कळ…’

ईद २०२० ला अक्षय फोडणार ‘लक्ष्मी बाॅम्ब’
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा