महेशचं देवेंद्रला 'दबंग' गिफ्ट

वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकानं आपल्याला काही ना काही गिफ्ट द्यावं असं सर्वांनाच वाटत असतं, पण एखाद्या मित्रानं थेट सलमान खानच्या सिनेमात काम करण्याचं 'दबंग' गिफ्ट दिलं तर त्याच्या आनंदाला पारावारच उरणार नाही हे खरं.

  • महेशचं देवेंद्रला 'दबंग' गिफ्ट
SHARE

वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकानं आपल्याला काही ना काही गिफ्ट द्यावं असं सर्वांनाच वाटत असतं, पण एखाद्या मित्रानं थेट सलमान खानच्या सिनेमात काम करण्याचं 'दबंग' गिफ्ट दिलं तर त्याच्या आनंदाला पारावारच उरणार नाही हे खरं. 


भूमिका गिफ्ट

मित्राच्या वाढदिवसाला कुणी आवडत्या वस्तू, कपडे,  केक,  फुले,  भेटकार्ड देतं, तर कुणी सरप्राईज पार्टी, पण जर कुणी आपल्या मित्राला वाढदिवसाला चक्क सुपरस्टारसोबत सिनेमात एक भूमिकाच गिफ्ट दिली तर? हो, असंच एक सरप्राईज दबंग गिफ्ट कॅमेरामन महेश लिमये यांनी आपला मित्र अभिनेता देवेंद्र गायकवाड याला दिलं आहे. कधी स्वप्नातही न पाहिलेलं हे गिफ्ट मिळाल्यानं देवेंद्र भलताच भारावून गेला. मित्र महेशला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला त्याच्याकडे शब्दही नव्हते.


सेटवर बोलावलं

सिनेमॅटोग्राफर महेश लिमये सध्या सुपरस्टार सलमान खानच्या 'दबंग ३' चं छायांकन करत आहे. महेशचा मित्र देवेंद्र गायकवाडचा वाढदिवस होता. हे औचित्य साधत महेशनं पुण्याजवळील फलटण येथून 'दबंग ३'च्या शुटींग सेटवरून देवेंद्रला फोन केला. फोनवर फार काही न बोलता त्यानं देवेंद्रला थेट फलटणला बोलावून घेतलं. 'दबंग ३'च्या सेटवर पोहोचलेल्या देवेंद्रला महेशनं वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट म्हणून चक्क 'दबंग ३'मध्ये एक छोटी भूमिका दिली.


भूमिकेचं कौतुक

देवेंद्रनं छोट्याशा भूमिकेत केलेल्या अभिनयाचं दिग्दर्शक प्रभू देवासोबतच सलमान खान आणि संपूर्ण युनिटनं कौतुक केलं आणि त्याला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छाही दिल्या. देवेंद्रनं यापूर्वी 'मुळशी पॅटर्न', 'बबन', 'देऊळ बंद', 'एक हजाराची नोट', 'किल्ला', 'रेगे', 'मंगलाष्टक - वन्स मोर',  'सलाम' आदी चित्रपटांमध्ये तसंच 'तुझं माझं जमेना', 'बेधुंद मनाच्या लहरी', 'पिंपळपान' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. याशिवाय त्यानं बऱ्याच प्रायोगिकांसह 'माकडाच्या हाती शॅम्पेन' या गाजलेल्या व्यावसायिक नाटकातही काम केलं आहे. २००४ मध्ये रंगभूमीवर आलेल्या देवेंद्रच्या 'देता का करंडक' या एकांकिकेनं पुरुषोत्तम करंडक फटकावला आहे.हेही वाचा -

'कारगिल गर्ल' बनली जान्हवी

अभिजीत कोसंबीनं गायली 'तेली गल्लीचा राजा'ची महती
संबंधित विषय
ताज्या बातम्या