Advertisement

क्रांती रेडकरचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड 'झेडझेड'

आजच्या काळातील कलाकार अभिनय क्षेत्रासोबतच इतरही क्षेत्रांमध्येही आपला ठसा उमटवण्यासाठी उत्सुक असतात. अभिनेत्री क्रांती रेडकरनंही एक नवं पाऊल टाकत स्वत:चा क्लोथिंग ब्रँड लाँच केला आहे.

क्रांती रेडकरचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड 'झेडझेड'
SHARES

आजच्या काळातील कलाकार अभिनय क्षेत्रासोबतच इतरही क्षेत्रांमध्येही आपला ठसा उमटवण्यासाठी उत्सुक असतात. अभिनेत्री क्रांती रेडकरनंही एक नवं पाऊल टाकत स्वत:चा क्लोथिंग ब्रँड लाँच केला आहे.

नेहमी फॅशनचं आकर्षण असलेले कलाकार कपडे आणि डिझायनिंगकडे वळतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे यांनी स्वत:चा 'तेजाज्ञा' हा ब्रँड लोकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवला आहे. या दोघींमागोमाग आता क्रांती रेडकरही डिझायनिंगकडं वळली आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळणाऱ्या क्रांतीमधील आणखी एक टॅलेंट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आले हो, पण ते नेमकं कोणतं टॅलेंट याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता बऱ्याच जणांना होती. क्रांतीमधील हेच ते टॅलेंट आहे, ज्या बाबत काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं.

अभिनय आणि दिग्दर्शनाच्या बळावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेल्या क्रांतीनं आपला स्वत:चा क्लोथिंग ब्रँड लाँच करुन एक नवा पैलू जगासमोर आणला आहे. मुंबईमध्ये क्रांतीचा क्लोथिंग ब्रँड 'झेडझेड - झिया झ्यादा' हा लाँच करण्यात आला. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करतो, तेव्हा आपल्याला चिअर अप करण्यासाठी आपल्या खास मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छा आपल्यासोबत असतातच. त्याचप्रमाणं क्रांतीच्या खास जवळ असणाऱ्या व्यक्ती आणि आपल्या सिनेसृष्टीतील कलाकारांच्या विशेष उपस्थितीत क्रांतीचा क्लोथिंग ब्रँड लाँच करण्यात आला. सर्वांनी क्रांतीला शुभेच्छा देऊन तिच्या नवीन उपक्रमाला प्रोत्साहन दिलं.

नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झालेली क्रांती अशा एका प्लॅटफॉर्मच्या शोधात होती, जिथं तिच्या नवीन कल्पना, योजना समजून घेतल्या जातील आणि त्याच दरम्यान तिची भेट अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट टॅलेंटशी झाली. जसा प्लॅटफॉर्म हवा होता तसाच प्लॅटफॉर्म क्रांतीला प्लॅनेट टीच्या माध्यमातून मिळाला आणि या माध्यमाच्या मदतीनं तिनं स्वत:मधील टॅलेंट म्हणजेच 'झेडझेड' हा ब्रँड प्रेक्षकांसमोर आणला आहे. सर्वांना क्रांतीच्या या नवीन क्लोथिंग ब्रँडबद्दल आकर्षण आहे. या माध्यमातून क्रांतीची फॅशन स्टाईल आणि युनिक कलेक्शन पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा