अवधूत-आदर्शचा ‘वक्रतुंड महाकाय’

गणेशोत्सवासाठी आता हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके दिवस उरले आहेत. मुंबईसारख्या मोठया शहरांपासून कोकणातील लहानशा खेड्यापर्यंत सर्वांनाच गणेशाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांनीही गणेशोत्सवाची जबरदस्त तयारी केली. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अवधूत-आदर्श यंदा ‘वक्रतुंड महाकाय’ या गाण्याचा व्हिडिओ घेऊन आले आहेत.

गाण्याचा व्हिडीओ लाँच

अवधूत-आदर्शच्या आवाजाने सजलेला ‘वक्रतुंड महाकाय’ या खास गाण्याचा व्हिडीओ नुकताच सागरिका म्युझिकने सोशल मीडियावर लाँच केला आहे. सागरिका दास यांनी या व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे. या व्हिडिओमध्ये ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेना आणि ‘घाडगे आणि सून’ मधील रिचा अग्निहोत्रीसह नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी अभिनय केला आहे.

‘लगबग चालली...’सारखं गोड चालीचं गीत देणाऱ्या संगीतकार सुहित अभ्यंकरने हे गीत संगीतबद्ध केलं आहे. पारंपरिक ढोल, ताशा, तुतारी या वाद्यांसोबत गिटारचा सुंदर मिलाफ या गाण्यात करण्यात आला आहे. नचिकेत जोग यांनी गाण्याचे साधेसोपे, अर्थपूर्ण आणि आजच्या परिस्थितीला साजेशे असे शब्द लिहिले आहेत.


हेही वाचा -

नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा 'दोस्तीगिरी'!

पुढील बातमी
इतर बातम्या