Advertisement

नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा 'दोस्तीगिरी'!


नि:स्वार्थ मैत्रीवरचा रिफ्रेशिंग सिनेमा 'दोस्तीगिरी'!
SHARES

शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. या सुंदर नात्यावरचा ‘दोस्तीगिरी’ हा चित्रपट २४ ऑगस्टला सिनेमागृहात झळकणार आहे.

‘दोस्तीगिरी’ सिनेमाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक विजय शिंदे, यांच्यासह संकेत पाठक, राहुल डोंगरे, पूजा मळेकर, विजय गीते, पुजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे हे कलाकार उपस्थित होते.


दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

दिग्दर्शक विजय शिंदे म्हणाले, ही पाच जिवलग मित्र-मैत्रिणींची कथा आहे. मनोज वाडकर यांनी आजच्या कॉलेज युवकांच्या भाषेत सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. सिनेमाचे निर्माते दिवंगत संतोष पानकर यांनी तीन वर्षांपूर्वी या सिनेमाचं स्वप्न पाहिलं होतं, पण दुर्देवानं त्यांचा एक महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांचं स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचं समाधान आहे.

आम्ही सर्वांनीच या सिनेमासाठी कसून मेहनत केली आहे. मी या सिनेमात सॅम ही भूमिका साकाली आहे. योगायोगाने म्हणजे माझे वडिलही मला प्रेमाने सॅम हाक मारायचे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाद्वारे मी सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे.
- संकेत पाठक, अभिनेता

अक्षय वाघमारे म्हणाला, मी नेहमीच युवांवर आधारित असणाऱ्या सिनेमांत काम केलं, पण ‘दोस्तीगिरी’ खूप वेगळा सिनेमा आहे. या सिनेमाच्या सेटवर मला जीवाभावाचे मित्रमैत्रिण मिळाले.

पूजा जयस्वाल म्हणाली, प्रत्येकासाठीच आपल्या कॉलेजमधली मैत्री खूप खास असते. सिनेमा पाहताना तुम्हांला आपल्या कॉलेजचीच आठवण होईल. मैत्रीच्या नात्यातले वेगवेगळे कंगोरे तुम्हांला या सिनेमात पाहायला मिळतील.

अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स प्रस्तुत मोरया मुव्हिज क्रिएशन्स निर्मित ‘दोस्तीगिरी’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर यांनी लिहीले आहेत. रोहन-रोहन यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे.


हेही वाचा - 

'बुद्ध’चा जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर

Exclusive: पुलंच्या साहित्याचे अधिकार नेमके कुणाकडे? 'लोकमान्य सेवा संघा'चाही दावा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा