Advertisement

‘बुध’चा जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर

हरियाणा येथील हिस्सारमध्ये होणाऱ्या नवव्या जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बुध’चा प्रीमियर शो दाखवण्यात येणार आहे.

‘बुध’चा जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर
SHARES

काही दिवसांपूर्वीच ‘बाजीरावचे गीतकार बनले दिग्दर्शक’ ही बातमी ‘मुंबई लाइव्ह’ने प्रकाशित झाली होती. यात ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमाचे गीतकार प्रशांत इंगोले ‘बुध’ या लघुपटाद्वारे दिग्दर्शक बनल्याचं म्हटलं होतं. अाता इंगोलेंच्या या ‘बुध’चा प्रीमियर जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.



ही अभिमानाची बाब

इंगोले यांनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल नजरेसमोर ठेवून ‘बुध’ हा लघुपट बनवला आहे. या लघुपटाचं लेखन इंगोले यांनीच केलं असून, त्यांची आई विमल इंगोले यांनी निर्मिती केली आहे. हरियाणा येथील हिस्सारमध्ये होणाऱ्या नवव्या जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बुध’चा प्रीमियर शो दाखवण्यात येणार आहे. जागरणसारख्या महत्त्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बुध’चा प्रीमियर होणं ही अभिमानाची बाब असून, याचं श्रेय संपूर्ण टिमला जातं असं इंगोले यांचं म्हणणं आहे.


तीन तरुणींची कथा

‘बुध’मध्ये इंगोले यांनी विविध वयोगटातील तीन तरुणींची कथा मांडली आहे. झैनाब, लक्ष्मी आणि इवोनी यांच्याभोवती या स्त्रीप्रधान लघुपटाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. या लघुपटाच्या माध्यमातून इंगोले यांनी आजच्या सामाजिक परिस्थितीचं चित्रण केलं आहे. गीतांजली मिश्रा, रीचा मीना, सबीना जाट, सुदीप सारंगी, विनीत शर्मा आदी कलाकारांनी या लघुपटात अभिनय केला आहे. गणेश गंगाधरन यांनी या सिनेमाचं साऊंड डिझायनिंग केलं असून, चंदन कोवली यांनी छायांकन केलं आहे. संकलन महेश किल्लेकर आणि गुरू पाटील यांचं आहे, तर श्रेयस पुराणीकने यातील एका गाण्याला संगीत दिलं आहे.



हेही वाचा -

Exclusive: पुलंच्या साहित्याचे अधिकार नेमके कुणाकडे? 'लोकमान्य सेवा संघा'चाही दावा

Exclusive: पुलंच्या साहित्याचा परवानगीविना वापर; नमुने मालिकेवर 'आयुका'चा ५० लाखांचा दावा




 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा