नवी मुंबई, पनवेल, तळोजामधील वायू प्रदूषण तिपटीनं वाढलं

खारघर, पनवेल आणि तळोजामधील  वायू प्रदूषणात तिपटीनं वाढ झाली आहे.  येथील हवेतील प्रदूषण पातळी प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.  वातावरण फाऊंडेशन या पर्यावरण संस्थेने गेल्या महिनाभर केलेल्या मोजणीतून ही बाब समोर आली आहे.

वातावरण संस्थेने १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा खारघर, पनवेल आणि तळोजा परिसरात पाच ठिकाणी कार्यरत केली. त्यातील नोंदीनुसार  येथील हवेतील प्रदूषण पातळी ६० पीएमवरुन २०० पीएमवर पोहोचली आहे. हवेतील प्रदूषण तिप्पटीने वाढल्याचं यातून समोर आलं आहे.

तळोजा एमआयडीसीमधील कंपन्यांमधून हवेत सोडले जाणारे विषारी गॅस, सुरु असलेलं नवीन बांधकाम, हायवेवरुन जाणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर आदी करणांमुळे येथील प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर गेली आहे.  वातावरण फाऊंडेशनने एक महिनाभर हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एअर क्वॉलिटी मॉनिटर मशीन बसवल्या होत्या.१३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबरपर्यंत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली.

पनवेल, तळोजा एमआयडीसी, नावडे, खारघर सेक्टर ३६, खारघर सेक्टर ७ या पाच ठिकाणी बसवलेल्या या मशीनमध्ये हवेची गुणवत्ता रोज तपासली गेली. सलग महिनाभर तपासलेल्या हवेच्या गुणवत्तेत २०० पीएमपर्यंत प्रदूषणाची पातळी नोंदवली गेली आहे. ६० पीएमच्या खाली हवेतील प्रदूषण पातळी असेल तर त्याचा परिणाम माणसाच्या शरीरावर होत नाही.


हेही वाचा -

मोनोरेलचा महसूल वाढविण्यासाठी 'जाहिरातबाजी'

मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप


पुढील बातमी
इतर बातम्या