Advertisement

मोनोरेलचा महसूल वाढविण्यासाठी 'जाहिरातबाजी'

मुंबईत वडाळा-चेंबूर-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल सातत्यानं तोट्यात आहे. याचा परिणाम मोनोच्या महसुलावर होत आहे.

मोनोरेलचा महसूल वाढविण्यासाठी 'जाहिरातबाजी'
SHARES

मुंबई मोनोरेलचा महसूल वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जाहिरातबाजी करणार आहे. मुंबईत वडाळा-चेंबूर-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर धावणारी मोनोरेल सातत्यानं तोट्यात आहे. याचा परिणाम मोनोच्या महसुलावर होत आहे. त्यामुळं मोनोला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मोनोरेलच्या खांबांना जाहिरातबाजीसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.

प्राधिकरणानं २ मोनोरेलची पुनर्बांधणी केली आहे. भारतीय सुट्या भागाच्या मदतीनं ही पुनर्बांधणी करण्यात आली आहे. स्वदेशी मोनोवर भर दिला जात आहे. मोनो धावत असली, तरी तिला प्रतिसाद कमी आहे. वडाळा, चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक मार्गावर प्रवासी फार कमी आहेत.

मुळात वडाळ्यासारख्या परिसरात रहिवासी वस्ती जास्त आहे. कार्यालयं अथवा तत्सम वस्ती कमी आहे. इथं रहदारीही कमी आहे. अशा वेळी थेट चेंबूरहून, वडाळ्याहून मध्य मुंबई म्हणजे लालबाग गाठणाऱ्या प्रवाशाची संख्या कमी आहे. ऐन पीक अवर म्हणजे सकाळी आणि संध्याकाळीही मोनोरेलचे प्रवासी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे असतात.

मोनोरेलला महसूल मिळावा, म्हणून मोनोच्या खांबांवर जाहिरातीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आता प्राधिकरणाचे मोनोरेलच्या खांबांवर जाहिरातीसाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हणणे असले, तरी त्यांना प्रतिसाद किती मिळतो, हे काळच ठरविणार आहे. प्रवासी वाढविण्यासाठी २ मोनोरेलमधील अंतर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर कसे येईल, यावर भर दिला जात आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा