Advertisement

मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप

मुंबई महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं मुंबई विभागीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष, आमदार भाई जगताप यांनी रविवारी जाहीर केलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप
SHARES

मुंबई महापालिका निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं  मुंबई विभागीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष, आमदार भाई जगताप यांनी रविवारी जाहीर केलं आहे. 'मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यात येईल. एकूण २२७ वॉर्डांमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आमचे सर्व उमेदवार लढतील. याआधी राष्ट्रवादीसोबत राज्यात आघाडीत असतानाही मुंबईत काँग्रेस स्वतंत्रपणे लढली असून, यापुढेही ती स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरी जाईल', असं जगताप यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळं वॉर्ड पातळीपर्यंत पक्षसंघटना बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं, तरी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना तोंड फोडण्याचं काम कॉंग्रेस करणार असल्याचं भाई जगताप यांनी म्हटलं.

'मुंबईतील पक्ष संघटना बळकट करून मुंबई काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न असून, या कामासाठी मुंबईतील जुने नेते, माजी खासदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षात असून, ती भूमिका महापालिकेपुरती तशीच कायम ठेवण्यात येईल', असं त्यांनी म्हटलं.

शिवाय, मुंबईत कॅप्टन म्हणून पक्षातील बदल निश्चित करून दाखवणार असल्याचा दावाही त्यांनी केला. 'माझ्यासोबत अनुभवी आणि चांगली टीम देण्यात आली आहे. नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. मुळात आमच्याकडे कोणीच नाराज नाही. हायकमांडनं एकदा नियुक्त्या जाहीर केल्यानंतर सर्व एकदिलानं कामाला लागतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा