वरळी : कचरा समुद्रात मिसळू नये म्हणून पालिका बसवतेय रेक स्क्रिन्स

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMCनं वरळीतील लव्हग्रोव्ह स्टॉर्मवॉटर पंपिंग ड्रेनला जोडलेल्या नाल्यातील कचरा आणि तरंगणाऱ्या वस्तू काढून टाकण्यासाठी मेकॅनिकल रॅक स्क्रीन बसवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावासाठी प्रशासनाला कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरीटीकडून कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ)ची मंजुरी मिळाली आहे.

मॅकेनिकल रॅक स्क्रिनचा उपयोग पावसाळ्यात अधिक होणार आहे. या स्क्रिनच्या मदतीनं पावसाळ्यात पंपिंग स्टेशनमध्ये कचरा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा गाळ साचणार नाही. या विशिष्ट पंपिंग स्टेशनचा उपयोग दक्षिण-मध्य मुंबईकडून पावसाळ्याच्या वेळी जादा पाणी बाहेर काढण्यासाठी केला जातो. जो नंतर अरबी समुद्राकडे वळवला जातो.

कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरीटीनं अशीही घोषणा केली की, ते दादर समुद्रकिनारी बदल घडवून आणण्यासाठी राज्याच्या हार्बर अभियांत्रिकी विभागाच्या प्रस्तावाला स्थगित करतील. या प्रस्तावात समुद्र किनारा दिसण्यासाठी टेकडी, टेकडीसाठी पायऱ्या, विसर्जन रॅम्प, सँडपीट्स आणि व्हॉलीबॉल कोर्टसह खेळाचे क्षेत्र उभारण्यात येईल असा प्रस्ताव होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर बीचवर प्रवासी जेट्टी आणि संबंधित सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं (MMB) केलेला वेगळा प्रस्ताव एमसीझेडएमएनंही फेटाळला. प्रस्तावित बांधकाम क्षेत्र देखील एक कासव प्रजनन स्थळ असल्याचं समजल्यानंतर हा प्रस्ताव नाकारला गेला.

मुंबई, पालघर, ठाणे आणि इतर क्षेत्रांमध्ये MMBनं अन्य प्रस्ताव नाकारलेले आहेत. कारण एमसीझेडएमएनं म्हटलं आहे की, प्रकल्पांविषयी आवश्यक ती माहिती मिळाली नाही.


हेही वाचा

वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईला २४४ कोटींचा निधी

यंदा फटाकेमुक्त दिवाळी‌? राज्य मंत्रिमंडळात मागणी करणार...

पुढील बातमी
इतर बातम्या