Advertisement

यंदा फटाकेमुक्त दिवाळी‌? राज्य मंत्रिमंडळात मागणी करणार...

दिवाळी साजरी करताना गर्दी टाळण्यासोबतच महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

यंदा फटाकेमुक्त दिवाळी‌? राज्य मंत्रिमंडळात मागणी करणार...
SHARES

कोरोनाचं संकट अद्याप कायम असून सणासुदीच्या काळात प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आवश्यक आहे. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळण्यासोबतच महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी जनतेला केलं आहे.

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण कक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा- क्वारंटाईन केंद्र म्हणून वापरलेल्या शाळांविरोधात शिक्षकांची तक्रार

सणासुदीच्या काळात गर्दी होऊन त्याद्वारे कोरोनाचा प्रसार होण्याचा मोठा धोका असल्याने राज्य सरकारकडून सर्वधर्मियांना यंदाचे सण साधेपणाने साजरे करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यानुसार गणेशोत्सव, ईद, आंबेडकर जयंती, दसरा असे सर्वच महत्त्वाचे दिवस घरच्या घरीच साजरे करण्यावर भर देण्यात आला. सणांसाठी राज्य सरकारकडून एसओपी देखील जारी करण्यात आली होती.

त्याचप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने दिवाळीत (diwali) होणारी गर्दी टाळण्याचंही आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. शिवाय फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो. प्रदूषणही होतं त्यामुळे या काळात आरोग्य जपा, असा सल्ला देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

दिवाळीच्या काळात मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावं, हात सातत्याने धूत रहावेत या उपाययोजनांचा अवलंब करताना फटाकेमुक्त (crackers) दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आरोग्मयंत्र्यांनी केलं आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

(no crackers this diwali says maharashtra health minister rajesh tope)

हेही वाचा- लाॅकडाऊनच्या काळात ऊर्जा विभागाला १५ हजार कोटींचा तोटा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा