Advertisement

क्वारंटाईन केंद्र म्हणून वापरलेल्या शाळांविरोधात शिक्षकांची तक्रार

राज्य शिक्षण परिषदेनं बुधवारी महानगरपालिकेला पत्र लिहून कोविड केअर सेंटर म्हणून वापरल्या जाणार्‍या नागरी शाळांमधील स्वच्छतेबद्दल तक्रार केली.

क्वारंटाईन केंद्र म्हणून वापरलेल्या शाळांविरोधात शिक्षकांची तक्रार
SHARES

महाराष्ट्रातील शिक्षक संघटना, राज्य शिक्षण परिषदेनं बुधवारी महानगरपालिकेला पत्र लिहून कोविड केअर सेंटर म्हणून वापरल्या जाणार्‍या नागरी शाळांमधील स्वच्छतेबद्दल तक्रार केली.

ऑगस्टमध्ये सुमारे २७० पालिका शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरल्या होत्या. आता त्या पालिकेच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. पण आता त्यांच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारनं १४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकावेळी फक्त ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळांमध्ये बोलावलं जाऊ शकतं. तथापि, शिक्षकांनी असं सांगितलं की, शाळेच्या आवारातील परिस्थिती त्यांच्यासाठी काम करण्यास सुरक्षित नाही.

अनेक शिक्षकांचा आरोप आहे की, प्रशासनानं सॅनिटायझर्स आणि इतर साफसफाईची सामग्री पुरवली नाही. बर्‍याच ठिकाणी, वॉशरूममध्ये कोणतीही साफसफाई केली गेली नव्हती. इतकी वाईट अवस्था होती की ती कोणाला वापरण्याच्या लाईकिची पण नाहीत.

राज्य शिक्षण परिषदेचे सदस्य शिवनाथ दराडे यांनी बुधवारी तीन प्रशासकिय शाळांना भेटी दिल्या. त्यांना टिळक नगरातील एका शाळेलं काही विद्यार्थ्यांना बोलावलं असल्याचं आढळलं.

त्यांनी दोन छायाचित्रं आणि एक व्हिडिओ शेअर केला ज्यात जमिनीवर बेडशीट टाकून सामाजिक अंतरावर सहा मुलांना बसवण्यात आलं होतं. त्यांनी पालिकेला लिहिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये न बोलण्याची विनंती केली आहे.

परंतु, पालिकेचे शैक्षणिक अधिकारी महेश पालकर यांनी असा दावा केला की, त्यांना नियमित वर्ग घेण्यासाठी बोलावलं जात नव्हतं. त्यांना कार्यपत्रक आणि इतर साहित्य गोळा करण्यासारखे काही ऑफलाइन काम करण्यासाठी येण्यास सांगितलं जाईल.



हेही वाचा

FYJC Online Classes: महाराष्ट्रात पहिल्या दिवशी ऑनलाईन क्लासला २.२ लाख विद्यार्थी हजर

ऑनलाईन शिक्षणातूनही मिळणार दिवाळीची सुट्टी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा