Advertisement

FYJC online classes: महाराष्ट्रात पहिल्या दिवशी ऑनलाईन क्लासला २.२ लाख विद्यार्थी हजर

विज्ञान आणि कला वर्ग 11 (FYJC)च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सोमवार २ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू झाले.

FYJC online classes: महाराष्ट्रात पहिल्या दिवशी ऑनलाईन क्लासला २.२ लाख विद्यार्थी हजर
SHARES

विज्ञान आणि कला वर्ग 11 (FYJC)च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सोमवार २ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू झाले. पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील २.२ लाख विद्यार्थी या ऑनलाईन वर्गात सहभागी झाले. YouTube वर विनामूल्य प्रसारीत उपलब्ध केले जात आहेत.

सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांबाबत अस्पष्टतेमुळे एफवायजेसीचे प्रवेश थांबवण्यात आले होते. मराठा आरक्षणा संदर्भात ठोस निर्णय झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.

सध्या महाराष्ट्रातील १४.३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी एफवायजेसीसाठी प्रवेश पत्र भरले आहे. त्यापैकी ११.५ लाखाहून अधिक लोकांनी पहिल्या फेरीत प्रवेश मागवला आहे. पुढील फेरीची प्रतीक्षा करीत असलेल्या उर्वरित २.७९ लाख विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल.

पुढच्या प्रवेशाच्या फेऱ्या आणि त्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेबाबत अधिकारी अस्पष्ट आहेत. सरकार आणि निवडक गटांच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेशपत्रं देण्यात आलेली नाहीत.

तथापि, शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. म्हणूनच त्यांनी सोमवारपासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “ऑनलाइन क्लास सुरू झाले आहेत जेणेकरुन यापुढे आणखी उशीर होऊ नये.”

प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत. या वर्गांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथं नोंदणी केली पाहिजे. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना वेळापत्रक आणि आवश्यक तपशील देण्यात येईल.हेही वाचा

ऑनलाईन शिक्षणातूनही मिळणार दिवाळीची सुट्टी

ठाण्यातील दोन गावांनी विद्यार्थ्यांसाठी केली मोफत वायफायची सोय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा