Advertisement

लाॅकडाऊनच्या काळात ऊर्जा विभागाला १५ हजार कोटींचा तोटा

ऊर्जा विभागाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी वीज बिल थकबाकी वसूल करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले.

लाॅकडाऊनच्या काळात ऊर्जा विभागाला १५ हजार कोटींचा तोटा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील ८ महिन्यांत ऊर्जा विभागाच्या उत्पन्नात १४, ६६२ कोटी रुपये इतकी तूट निर्माण झाली आहे. या तुटीतून ऊर्जा विभागाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी वीज बिल थकबाकी वसूल करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. सोबतच उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे, बाह्य यंत्रणांकडून घेतलेलं कर्ज कमी करून भविष्यातील कर्जासाठी पत वाढवावी, असा कृती कार्यक्रम राबविण्याचे आदेश देखील ऊर्जामंत्र्यांनी दिले.

राज्य सरकारच्या महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा नितीन राऊत (nitin raut) यांनी घेतला. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे तसंच तीनही कंपन्याचे वित्त संचालक उपस्थित होते.

हेही वाचा- Electricity Bill: वाढीव वीज बिलांवर दिवाळीपर्यंत निर्णय!

लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत देतानाच राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि शासकीय कार्यालये यांच्याकडील प्रलंबित थकबाकी वसूल करण्याला प्राधान्य द्यावा. सर्व आमदार आणि पालकमंत्री यांना पत्रे पाठवून वीज बिल थकबाकी वसुली प्रकरणी सूचना मागवाव्यात. वीज बिल कमी यावे म्हणून अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर संगनमत करून महावितरणचा महसूल बुडवण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येतात. ही लूट थांबायला हवी, असे स्पष्ट आदेश डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

नियमानुसार शासकीय यंत्रणांकडून थकबाकी (electricity bill) वसूल करताना कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका, विजेच्या थकबाकीमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी अध्ययन करून उपाययोजना कराव्यात. ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे, अशा ठिकाणी रेड, ब्लॅक झोन नुसार वर्गवारी करण्यात यावी. राज्यात २ कोटी ३ लाख घरगुती वीज ग्राहक असून त्यापैकी ९० लाख ग्राहकांचा वीज वापर केवळ ० ते ५० युनिट आहे. याकडे उर्जामंत्र्याचं तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे यांनी लक्ष वेधलं. त्यानंतर  ० ते ५० युनिट वापरकर्त्या ग्राहकांचं मीटर प्रत्यक्ष जाऊन तपासण्यात यावं. त्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः फिल्डवर जाऊन तपासणी करावी, आदी सूचना यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. (maharashtra energy department loss 15 thousand crore rupees during lockdown)

हेही वाचा- महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन टाका ‘ऑप्टिकल फायबर’- ऊर्जामंत्री नितीन राऊत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा