Advertisement

Electricity Bill: वाढीव वीज बिलांवर दिवाळीपर्यंत निर्णय!

वाढीव वीज बिलांमध्ये सर्वसामान्यांना सवलत देण्यावर सकारात्मक चर्चा सुरू असून त्यावर दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Electricity Bill: वाढीव वीज बिलांवर दिवाळीपर्यंत निर्णय!
SHARES

लाॅकडाऊनच्या काळात वीज कंपन्यांकडून पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमध्ये (electricity bill) सर्वसामान्यांना सवलत देण्यावर सकारात्मक चर्चा सुरू असून त्यावर दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, कोविड कालावधीमध्ये लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगारावर विपरित परिणाम झाला. लोकांना सक्तीने घरामध्ये रहावं लागल्यामुळे विजेचा वापर वाढला. त्यातून अधिक वीजबिलं आली. त्यामुळे या वाढीव वीज बिलांबाबत दिलासा देण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत माहिती देताना नितीन राऊत यांनी सांगितलं, टाटाने मुंबईतील (tata power) वीजनिर्मितीसाठी अनेक प्रकल्प सुरू केले. मुंबई अंधारात जाऊ नये यासाठी १९८१ साली आयलँडिंग यंत्रणेचं कामही टाटा पॉवर कंपनीनेच केलं. मात्र १२ ऑक्टोबरला घडलेल्या वीजखंडित होण्याच्या घटनेमुळे अधिक चांगल्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा- महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन टाका ‘ऑप्टिकल फायबर’- ऊर्जामंत्री नितीन राऊत

वीजखंडित होण्याच्या घटनेच्या कारणांचा शोध घेणे, उपाययोजना करणे यासाठी ऊर्जा विभागाने तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमली आहे. तसंच केंद्रीय वीज प्राधिकरण आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगानेही (एमईआरसी) स्वतंत्र समित्या नेमल्या असून त्या तिन्हीच्या निष्कर्षाच्या आधारे हाती घ्यावयाच्या उपाययोजनांविषयीची माहिती एमईआरसीसमोर मांडण्यात येईल. वीजवहन यंत्रणा तसंच मुंबईसाठीच्या आयलँडिंग यंत्रणेमध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याबाबत अभ्यास करण्यात येत असून पुढील वर्षात आधुनिकीकरणाच्या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असंही ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.

१२ ऑक्टोबरसारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी महापारेषण, एसएलडीसी, टाटा पॉवर आणि अदानी वीज कंपनी यांच्यात समन्वय साधण्याची कार्यक्षम संदेशवहन आणि समन्वय व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. २०३० पर्यंत मुंबईची विजेची मागणी सुमारे ५ हजार मेगावॅट पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही गरज लक्षात घेऊन मुंबईला अखंडीत वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने वीजनिर्मितीमध्ये वाढ करणे, त्यासाठीचं नियोजन, त्याचा उत्पादन दर काय असेल आदींबाबत विचार करण्यात येईल. सध्या टाटा वीज प्रकल्पातील दोन संच बंद असून त्यातून अधिकची वीजनिर्मिती करता येईल तसंच तयार होणाऱ्या विजेचा दर माफक असेल आदींबाबतही विचार करण्यात येत आहे, अशी माहितीही नितीन राऊत यांनी दिली. (consumer will get relief in increased electricity bill soon says maharashtra energy minister nitin raut)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा