Mumbai Rains : शुक्रवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

ऑगस्टमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. बुधवार-गुरुवार असे दोन दिवस मुंबईतल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस (Mumbai Rains) पडला. शुक्रवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिमुसळधार तर मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत काही ठिकाणी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांत घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो

गुरुवारी सकाळी ८.३० पर्यांतच्या २४ तासांत मुंबई परिसरात अनेक ठिकाणी ६५ ते ११५ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला. पश्चिम उपनगरे, ठाणे, डोंबिवली-कल्याण, मीरा-भाईंदर इथं १० ते २० मिमी पाऊस पडला. तर नवी मुंबईत ५ ते १० मिमी आणि दक्षिण मुंबईत केवळ ५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.

हेही वाचा : अंधेरीत सापडलेल्या बिबळ्याची नैसर्गिक अधिवासात सुटका

दरम्यान १५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस मुंबई हायअलर्टवर आहे. कारण पुढचे ५ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्यानं जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. यामुळे अनेक नागरिक बस, ट्रेनमध्ये अडकले होते. त्यांच्यासाठी NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या.


हेही वाचा

१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

१५ आॅगस्टला लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…

पुढील बातमी
इतर बातम्या