मुंबईत वीजांच्या गडगडाटासह दमदार पाऊस

मान्सून केरळात येऊन दाखल झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक व्यक्ती सुखावला आहे. रविवारी दक्षिण मुंबईतील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने मुंबईतील दमटपणात वाढ होऊन उकाडाही वाढला होता. या उकाड्यापासून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे आहेत. कारण स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी रात्री मुंबईत गडगडटासह वादळी पावसाने दमदार हजेरी लावली.  

स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रातील दक्षिण-पूर्व भागात तसंच लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता येत्या ४८ तासांत वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई आणि किनारी भागामध्ये येत्या २ दिवसांत वादळी पावसाची शक्यता आहे.

हा पाऊस झाल्यास वातावरणात गारवा तयार होऊन मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होऊ शकते. मुंबईकरांना हवामानाचा अचूक अंदाज हवा असल्यास https://www.skymetweather.com/  तसंच http://www.imd.gov.in/Welcome%20To%20IMD/Welcome.php या संकेतस्थळावर जाता येईल.


हेही वाचा-

मुंबईतील १८० ठिकाणी तुंबू शकतं पावसाचं पाणी

अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता, मासेमारांना सतर्कतेचा इशारा


पुढील बातमी
इतर बातम्या