Advertisement

मुंबईतील १८० ठिकाणी तुंबू शकतं पावसाचं पाणी

पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या भागांची दरवर्षी पालिकेकडून दखल घेतली जाते. त्याचप्रमाणं, यंदाही पावसाचं पाणी साचल्याची मुंबईतील तब्बल १८० ठिकाणं महापालिकेनं निश्चित केली आहेत.

मुंबईतील १८० ठिकाणी तुंबू शकतं पावसाचं पाणी
SHARES

पावसाळ्यात मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईतील अनेक भागांत प्रचंड पाणी तुंबतं. समुद्राला भरती असल्यामुळं रस्त्यावर साचलेलं पाणी कमी होण्यास वेळ लागतो. त्यामुळं पाणी तुंबल्यानं प्रवाशांपासून सर्वांचेचं हाल होतात. पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या भागांची दरवर्षी पालिकेकडून दखल घेतली जाते. त्याचप्रमाणं, यंदाही पावसाचं पाणी साचल्याची मुंबईतील तब्बल १८० ठिकाणं महापालिकेनं निश्चित केली आहेत.

पाणी तुंबण्याची ठिकाणं

पालिकेनं जाहीर केलेल्या १८० ठिकाणांमध्ये सर्वाधिक १५ ठिकाणे माटुंगा येथील आहेत. त्याशिवाय, मालाडमध्ये १२, भांडुपमध्ये १२, मुलुंड ११, घाटकोपर ११, कुलाबा १०, वांद्रे पश्चिम १०, चेंबूर व मानखुर्द ११, वरळी ९, दादर ७, चेंबूर पूर्व इथं ८ ठिकाणं आहेत.

ठोस उपाययोजना

पावसाळ्यात पाणी तुंबून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मागील २ महिन्यांपासून महापालिकेचे पर्जन्य जलवाहिन्या विभाग, विद्युत आणि देखभाल विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काम करत आहेत. तसंच, गेल्यावर्षी पाणी तुंबलेल्या ठिकाणी यंदा पाणी न तुंबण्यासाठी ठोस उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

कारवाईचा निर्णय

मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी नालेसफाई, मॅनहोल, पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई, पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणची अतिक्रमणं हटवण्याची कामं दरवर्षी पालिकेमार्फत करण्यात येतात. तसंच पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पम्पिंग स्टेशनही बसविले जातात. मात्र, त्यानंतर देखील मुंबईत आणि उपनगरातील विविध भागांत पाणी तुंबतं. त्यामुळं पालिकेवर टीका करण्यात येते. परंतु यंदा पालिकेनं असं होऊ नये यासाठी, नाल्यांमध्ये कचरा टाकताना आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भागात पाणी तुंबण्याची शक्यता


परिसर
पाणी साचण्याचे ठिकाण
कुलाबा
गणेशमुर्तीनगरगीतानगरआंबेडकरनगर.
माटुंगा
खोदादाद सर्कल दादर टीटीकोरबा मिठागरभीमवाडी वडाळारेनॉल्ड्स कॉलनीशिवशक्तीनगरवच्छराजनगरसुब्रमण्यम रोडमुख्याध्यापक भवनचुनाभट्टी बसडेपोप्रतीक्षा नगर समाज मंदिर हॉलहेमंत मांजरेकर मार्गगांधी मार्केट-किंग्ज सर्कल.
मालाड
मार्वे क्वीन परिसरगंगाबावडी नंबर १लोटस इमारतमालाड सबवेपाटकरवाडीमंचुभाई रोडपुष्पा पार्कनडियादवाला चाळपारस अपार्टमेंटलगून रोड.
घाटकोपर
१५१ न्यू पंतनगरपोलिस वसाहतनारायणनगरदेवकाबाई चाळगौरीशंकरवाडीहरीपाडा कादरी चाळविद्याविहार स्टेशनघाटकोपर स्टेशनलक्ष्मीनगर म्हाडा कॉलनी.
भांडुप
मोरारजीनगरपाइपलाइन सबवेचंदन रुग्णालयटँक रोडहरीश्चंद्र खोपकर मार्गपाटीलवाडीभांडुप स्टेशनउषानगर पोलिस चौकीगांधीनगरविक्रोळी रेल्वे स्टेशन परिसरश्रीरामपाडाउदयश्री सोयायटी.
मुलुंड
एसएलरोडजव्हेर रोड जंक्शनरणजित सोसायटीशांती कॅम्पसहिरानगरभगवती सोसायटीजमुना सोसायटीकेळकर कॉलेजएलआयसी कॉलनीशीतल दर्शनसाहनी कॉलनी नवघर रोड.
वांद्रे पश्चिम
एसव्ही रोड रेल्वे कॉलनीजयभारत सोसायटीनॅशनल कॉलेजअल्मेडा पार्क ६वा आणि १० वा रोडरेक्लेमेशनखार सबवे.
चेंबूर
सोमैया नालासुभाष नगरशिवाजी नगरदेवनार नालामानखुर्द पीएमजी नालामहाराष्ट्र नगरबुद्ध नगररिफायनरी दक्षिणविजयनगरनवजीवन सोसायटीइंदिरा नगर वाशीनाकास्वस्तिक चेंबरसुमननगरपोस्टल कॉलनी रोड १५.




हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान व्हावं - प्रकाश आंबेडकर

विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालकांचा ९ जुलैपासून संप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा