Advertisement

अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता, मासेमारांना सतर्कतेचा इशारा

भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता, मासेमारांना सतर्कतेचा इशारा
SHARES

भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असं मतही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर सुरक्षितेसाठी मासेमारांनी ११ व १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणं टाळावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

वाऱ्याचा वेग वाढणार

राज्यात हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही. परंतु, त्याच्या प्रभावामुळं या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहणार आहे. तसंच, किनारपट्टी जवळील समुद्र काही प्रमाणात खवळलेला असणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्याशिवाय, कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळं सरक्षेच्या दृष्टीनं मासेमारांनी ११ आणि १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणं टाळावं, असं आवाहन हवामान विभागानं केले आहे.

कच्च्या बाधंकामांना धोका

वादळी वारे झाल्यास रस्त्यालगतची झाडे पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्याजवळील घरांना आणि कच्च्या बाधंकामांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील बांधकामं पडू शकतात, विजेचे खाबं उखडून ताराही गळून पडण्याची शक्यता आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनानं पावले उचलली आहेत. अनेक पर्यटक अलिबागसह रायगड आणि कोकणातील विविध समुद्र किनारी पर्यटनाला गेलेली असून त्यांनाही काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन

मुंबईच्या मरिन ड्राइव्ह, जुहू समुद्रात २ जण बुडाले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा