मागील २४ तासांत मुंबईत 'इतक्या' पावसाची नोंद

मुंबईत मान्सूनचं दाखल होऊन आता अनेक दिवस उलटून गेले तरी पावसानं दिलासादायक हजेरी लावली नाही. मुंबईत रात्री पाऊस दिवसा उकाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. मागील २४ तासात सांताक्रूझ इथं ३९ मिमी तसंच, कुलाबा इथं ३४ मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ इथं ४९३.१ मिमी सरासरीच्या तुलनेत जून महिन्यात ३६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई शहरात केवळ आतापर्यंत १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये ८४०.७ मिमी महिन्याच्या सरासरीसह सर्वाधिक पाऊस पडतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाच्या कार्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. ३ जुलै ते ५ जुलैदरम्यान मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० जुलैपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे.

यंदा पावसाला प्रचंड विलंब झाला आहे. यामुळे पाण्याची कमतरता निर्माण झाली असून यास आणखी विलंब झाल्यास शहराला अनेक भागात पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. मुंबई शहराला ७ तलावांद्वारे म्हणजे भातसा, तानसा, अप्पर वैतरणा, मध्यम वैतरणा, मोडक सागर, तुळशी, विहार या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो.

स्कायमेटनं २८ जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ५० टक्के जास्त पावसाची नोंद झाल्याचं म्हटलं. त्याशिवाय, विदर्भात नियमित पाऊस पडला असून, कोकण आणि गोवा ७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाल्याचं म्हटलं.


हेही वाचा -

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा


पुढील बातमी
इतर बातम्या