मुंबईत १९ जूनला मुसळधार पावसाची शक्यता

(Representational Image)
(Representational Image)

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. तर मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणात आणि घाट भागात पावसाचा अधिक राहिल. राज्यभरात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होणार असून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यभरात १८ जून मोसमी पाऊस सक्रिय होणार असून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच परिस्थिती असेल. उच्च लाटा आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्यानं केले आहे.

शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत कुलाबा येथे ९.४ मि. मी., तर सांताक्रूझ येथे ३.८ मि. मी. पावसाची नोंद झाली. १ ते १७ जून या काळात कुलाबा येथे १२९.७ मि. मी., तर सांताक्रूझ येथे ९८.१ मि. मी. पावसाची नोंद झाली.


हेही वाचा

मोसमी वारे, पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

पावसाळ्यानिमित्त MMRDA कडून कंट्रोल रुम्सची स्थापना, 'इथे' करा संपर्क

पुढील बातमी
इतर बातम्या