Advertisement

पावसाळ्यानिमित्त MMRDA कडून कंट्रोल रुम्सची स्थापना, 'इथे' करा संपर्क

पावसाळ्यात तुम्ही अडचणीत सापडला असाल तर आता एका कॉलवर तुम्हाला मदत मिळणार आहे.

पावसाळ्यानिमित्त MMRDA कडून कंट्रोल रुम्सची स्थापना, 'इथे' करा संपर्क
SHARES

MMRDA खडून पावसाळ्यानिमित्त नियंत्रण कक्षाची (Control Room) स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष 24 तास सुरु असेल.

पावसाळ्यात तुम्ही अडचणीत सापडला असाल तर आता एका कॉलवर तुम्हाला मदत मिळणार आहे. मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांसाठी MMRDA कडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पावसाळ्यात नागरिकांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाचे नंबरही MMRDA कडून देण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्ष नंबर –

022- 26591241
022- 26594176
8557402090

टोल फ्री – 1800228801

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. 

पावसाळयात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत आणि बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून पहिल्यांदाच एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7  जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली. 

ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर इथं प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड आणि एक तुकडी गडचिरोली इथे 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल.

यावर्षी मान्सून भारतात १० दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेकडून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच उष्णतेच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.



हेही वाचा

1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारीवर बंदी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा