Advertisement

मोसमी वारे, पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

मुंबईतील नुकत्याच झालेल्या पावसामुळे तसेच जोरदार वाऱ्याला अनुकूल हवामानामुळे प्रदूषणात घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोसमी वारे, पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
(Representational Image)
SHARES

मोसमी वारे आणि रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. त्याचबरोबर हवेतील धुळीकण स्थिरावल्याने हवेची गुणवत्ताही सुधारली आहे. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता निर्देशांक एकूण २५ एक्यूआयवर आल्याने हवेची गुणवत्ता उत्तम स्तरात असल्याची नोंद आहे.

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टींग अ‍ॅण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरील सोमवारीच्या अहवालानुसार, धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) प्रमाण घटले. मुंबईतील सर्व भागातील हवामानाची गुणवत्ता उत्तम स्तरात असल्याची नोंद आहे.

मुंबईत १० जूनपासून मोसमी पाऊस पडण्यास सुरुवात झाली. मागील दोन दिवस काही ठिकाणीच तुरळक पाऊस पडला. पहाटे ४ ते सकाळी ६ वाजेपर्यंत तुरळक पाऊस पडून दिवसभर ढगाळ वातावरण होते. समुद्री वारे आणि ढगाळ वातावरणामुळे हवेतील धुळीकणांचे प्रमाण कमी झाले आहे.

मुंबईत सुरू असलेली बांधकामे, खोदकामे, २४ तास सुरू असलेली वाहतूक, सफाई अभावी वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे हवेची गुणवत्ता खालावते. मात्र, पाऊस पडल्याने हवेतील धूलिकण जमिनीवर स्थिरावले आहेत. त्यामुळे, पावसाळा सुरू असेपर्यंत हवेतची गुणवत्ता चांगली राहील असे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.

AQICategory
Above 500 
Severe+
Above 400
Severe
Above 300
Very Poor
Excess of 200
Poor
100 to 199
Moderate
50 to 99
Satisfactory
 Below 50
Good



हेही वाचा

पावसाळ्यानिमित्त MMRDA कडून कंट्रोल रुम्सची स्थापना, 'इथे' करा संपर्क

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा