४८ तास धोक्याचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगाल परिसरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या ४८ तासात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर या दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, माथेरान, रायगड, ठाणे, मुंबई इथं मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, अकोला, परभणी आणि नांदेड हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही अमरावती, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज बाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.


हेही वाचा

जुहू समुद्र किनारी काळ्या वाळूची चादर

पूरस्थिती रोखण्यासाठी मुंबई भोवती तटबंदीचा पर्याय

पुढील बातमी
इतर बातम्या