Advertisement

जुहू समुद्र किनारी काळ्या वाळूची चादर

समुद्र किनाऱ्यावरील सुमारे ३ किलोमीटरची वाळू काळी (black sand) झाली आहे.

जुहू समुद्र किनारी काळ्या वाळूची चादर
SHARES

जुहू समुद्रकिनाऱ्यावर (juju beach) सुमारे ५ ते ८ किलोमीटरपर्यंतच्या किनाऱ्यावर तेल वाहून (oil) येण्याचा प्रकार अद्याप सुरूच आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावरील सुमारे ३ किलोमीटरची वाळू काळी (black sand) झाली आहे. वाळूत तेलाचे गोळे दुसून येत आहेत.

२०२१ च्या जूनपासून, जुहू समुद्रकिनाऱ्यावर डांबरासारखे तेलाचे गोळे दिसू लागले आहेत. तेल समुद्रात कसे आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्यात तेल मिसळणे(oil mix in water) हे समुद्रातील जीवजंतू आणि माशांसाठी खूप हानिकारक (impact on fish) ठरू शकते.

मान्सून सुरू झाल्यानंतर, पर्यावरणवादी, तसंच रहिवाशांनी, चिंबई आणि वसईच्या किनारपट्टीवरही लक्ष ठेवलं होतं. त्यावेळी असाच काळा तेलाचा तवंग त्यांना तिकडे पण आढळला. याशिवायमुंबईतील जुहू आणि वर्सोवा किनाऱ्यांवर देखील वारंवार असा तेलाचा तवंग पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यात समुद्राच्या भरतीमुळे वारंवार तेल किनाऱ्यावर वाहून येत आहे. पण तज्ञांनी सांगितलं की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

एकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) तेलाच्या तवंगाबद्दल सावध केलं गेलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी जुहू समुद्रकिनारी आलेल्या डांबरासारख्या काळ्या तेलाचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहे.

पण तज्ञांनुसार, यापूर्वी देखील आम्ही अशा प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. पण त्यावरून काहीही निष्कर्ष काढता आला नाही.

तर खोल समुद्रात मालवाहू जहाजातून तेल गळती झाली असण्याची शक्यता आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करू असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संयुक्त संचालक वाय बी सोनटक्के यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील वाहून आलेल्या तेलाची कारणे शोधण्यासाठी प्रभाग अधिकारी नेमला जाईल असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं होतं. प्रशासन समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अंसही त्यांनी सांगितलं होतं.

जुहू समुद्रकिनाऱ्यावर तेलाची तपासणी करण्यासाठी एक प्रभाग अधिकारी नेमला जाईल. हे कसं घडलं, याची कारणं आम्हाला अजून कळू शकली नाहीत, पण त्यामागची कारणे शोधली जातील असं ही त्या पुढे म्हणाल्या होत्या.

२०१६ मध्ये देखील अशाप्रकारची तेल गळती झाली होती. जुहू बीच हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. परंतु समुद्र बराच आत आला असून तेल गळती सारख्या घटना देखील वाढल्या आहेत. त्यामुळे समुद्रकिनारा वारंवार प्रदूषित होत आहे.

जुहू समुद्रकिनारी नियुक्त कंत्राटदाराला हे तवंग लवकरात लवकर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास सहा मेट्रिक टन वाळू आणि कचरा साफ करण्यात आला आहे असं के वेस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.हेही वाचा

खारफुटी क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर

२०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा