Advertisement

खारफुटी क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर

जवळपास १०६ संवेदनशील स्थळे सापडली आहेत ज्यात २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील.

खारफुटी क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर
SHARES

महाराष्ट्र सरकारनं मुंबई महानगर प्रदेशात खारफुटींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जवळपास १०६ संवेदनशील स्थळे सापडली आहेत ज्यात २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

तीन टप्प्यात हे सीसीटीव्ही लावले जातील. प्रथम, सीसीटीव्ही कॅमेरे भिवंडीत (Bhiwandi) लावले जातील, दुसऱ्या टप्प्यात ते मध्य आणि पश्चिम मुंबईला कव्हर करतील. तिसऱ्या टप्प्यात ते नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे (Thane) खाडीतल्या फ्लेमिंगो अभयारण्यात लावले जातील.

हवामान बदल अहवालाच्या आंतरशासकीय पॅनेलच्या पार्श्वभूमीवर हा ठराव घेण्यात आला आहे. या अहवालात भारतातील १२ किनारपट्टीची शहरे सापडली. त्यापैकी मुंबई (Mumbai) देखील समुद्राच्या पातळीच्या वाढीमुळे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जातं की खारफुटी चक्रीवादळांपासून नैसर्गिक संरक्षण म्हणून काम करतात. ज्यामध्ये अलीकडेच, मुंबईनं दोन वादळं झेलली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील आयोजित बैठकीत खारफुटी आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशनसाठी ३० कोटी रुपयांचे बजेटही अधिकृत करण्यात आलं. तळ कांदळवन प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठीच्या २५ कोटी रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसोबत (BNHS), संपूर्ण महाराष्ट्रात स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गाचं परीक्षण करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाचा कालावधी पाच वर्षांचा आहे.

खारफुटी वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, तसंच कांदळवन लागवड करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. कांदळवन प्रतिष्ठानमार्फत विकसित करण्यात येत असलेली निसर्ग क्षेत्रं, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि इतर उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पर्यटनाला चालना मिळावी, असंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा

मुंबईसह राज्यभर पावसाचा जोर वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

सिमेंट-काँक्रिटच्या भिंतीमुळे वर्सोवा समुद्रकिनारा नष्ट होईल, पर्यावरणप्रेमींची भीती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा