Advertisement

सिमेंट-काँक्रिटच्या भिंतीमुळे वर्सोवा समुद्रकिनारा नष्ट होईल, पर्यावरणप्रेमींची भीती

वाळूत उभारल्या जात असलेल्या या भिंतीमुळे या भागाचे वैभव असलेला हा वाळूचा संपूर्ण किनाराच नष्ट होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

सिमेंट-काँक्रिटच्या भिंतीमुळे वर्सोवा समुद्रकिनारा नष्ट होईल, पर्यावरणप्रेमींची भीती
SHARES

मुंबईतील वर्सोवा इथल्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्येच सिमेंट-काँक्रिटची भिंत उभारली जात असल्याचं समोर आलं आहे. धूप रोखण्याच्या उद्देशानं सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या संरक्षक भिंतीचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

वाळूत उभारल्या जात असलेल्या या भिंतीमुळे या भागाचे वैभव असलेला हा वाळूचा संपूर्ण किनाराच नष्ट होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. यासंदर्भात राज्यकर्ते, स्थानिक प्रशासन यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

इमारतींच्या मूळ कुंपणापासून सुमारे ३० फूट लांब, थेट वाळूमध्येच ही भिंत उभारली जात आहे. या दोन्हीमध्ये जॉगिंग ट्रॅक बनवला जात आहे. काही ठिकाणी टेट्रापॉड्सही टाकण्यात आले आहेत. यासाठी स्थानिकांशी चर्चा, त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणं, त्यांचे आक्षेप, अडचणी समजून घेणं यापैकी काहीही झालेलं नाही.

तीन ते चार दशकांपूर्वी वर्सोवा किनाऱ्यावरील इमारतींमध्ये लाटांचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी किनाऱ्यावर दगड आणून टाकण्यात आले होते. त्यानंतर पाणी इमारतींमध्ये शिरण्याचा त्रास कमी झाला होता. मात्र आता वाळूतच भिंत बांधण्यात येत असल्यानं वर्सोव्याचं वैभव असलेला समुद्र किनाराच उरणार नाही, ही भीती त्यांना सतावू लागली आहे.

वर्सोवा बीच हे मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाण आहे. तसंच ते ऑलिव्ह रिडले कासवांसाठी घरटे बनवण्याचे ठिकाण आहे. तो समुद्रकिनारा वाचवण्यासाठी काँक्रीट ब्लॉक काढण्याची मागणी करतो.

टाइम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात, झोरू बाथेना म्हणाले की, "मी नुकताच वर्सोवा किनाऱ्यावरून परतलो आहे आणि या सुंदर किनारपट्टीचा जलद विनाश पाहून अस्वस्थ आहे. संपूर्ण समुद्रकिनारा टेट्रापॉडनं झाकलेला आहे. त्यामुळे कोणताही वाळूवर चालण्यास मार्ग नाही. ऑलिव्ह रिडले कासवे इथं अंडी नाही घालू शकत. आम्ही, पर्यावरणवादी, मागणी करतो की ही भिंत काढून टाकावी, कारण ती बेकायदेशीरपणे उभारली गेली आहे. यामुळे पर्यावरणाचे आणखी नुकसान होईल. "

समुद्रात सातत्यानं होणाऱ्या भरावांमुळे समुद्राचे पाणी आपल्या वाटा दुसरीकडे शोधते. कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी-लिंक या दोन्हींचे परिणाम वर्सोव्याच्या खाडीवर झाल्याचे स्थानिक मच्छिमार सांगतात. या भरावांमुळे खाड्या गाळानं भरत आहेत.

पूर्वी वर्सोवा किनाऱ्यावर खेकडे मिळायचे, मात्र आता या किनाऱ्यावरील जैवविविधता नष्ट झाली आहे. पर्यावरणीय आघातांचे दुष्परिणाम विचारात न घेता तात्पुरती मलमपट्टी करणारे पर्याय शोधून त्यासाठी निधी खर्च केला जातो, असा स्थानिकांचा आरोप आहे.

बुधवारी, पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांच्या शिष्टमंडळानं, सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आणि स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींसह समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांना आढळलं की समुद्रकिनाऱ्याचा एक मोठा भाग टेट्रापॉड्सने भरलेला आहे. तर बांधली जाणारी नवीन भिंत जवळजवळ पूर्ण झाली आहे.

बॅथेनानं हे देखील उघड केलं आहे की, तो त्याच्या सहकारी हरित कार्यकर्ता - डी स्टालिनसह या बांधकामावर कायदेशीर कारवाई करू शकतो.



हेही वाचा

वायुप्रदूषणाचा परिणाम देशातील मोसमी पावसावर

राणीची बाग आता ऑनलाईन, 'अशी' करा व्हच्र्युअल सफर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा