Advertisement

वायुप्रदूषणाचा परिणाम देशातील मोसमी पावसावर

वायुप्रदूषणाचा परिणाम देशातील मोसमी पावसावरही होत असल्याचं तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट होत आहे.

वायुप्रदूषणाचा परिणाम देशातील मोसमी पावसावर
SHARES

वायुप्रदूषणाचा परिणाम देशातील मोसमी पावसावरही होत असल्याचं तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट होत आहे. ‘आंथ्रोपोजेनिक एरोसोल्स अ‍ॅण्ड द विकनिंग ऑफ द साऊथ एशियन समर मान्सून्स’ या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) क्लायमेट चेंज २०२१ – द फिजिकल सायन्स बेसिस’ या अहवालातही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

१९५१ ते २०१९ या काळात नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या सरासरीमध्ये घट झालेली दिसत आहे. ही परिस्थिती येत्या काही वर्षांत कायम राहणार असून यात वायुप्रदूषणाचा मोठा वाटा असेल.

‘वायुप्रदूषणामुळे देशभरात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण १० ते १५ टक्कय़ांनी कमी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या प्रमाणात ५० टक्के कमतरताही येऊ शकते. वायुप्रदूषणाचा परिणाम पावसाचे आगमन आणि गतिशीलता यांच्यावरही होऊ शकतो. वायुप्रदूषणामुळे भूपृष्ठाचे तापमान अपेक्षित मर्यादेपर्यंत वाढू शकत नाही. वातावरणातील प्रदूषकांच्या अस्तित्वामुळे भूपृष्ठाची तापमानवाढ कमी प्रमाणात होते’, असं भारतीय प्रौद्योगिक संस्था, दिल्ली (आयआयटी दिल्ली) इथल्या वातावरण विज्ञान केंद्राचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. दिलीप गांगुली यांनी सांगितलं.

वाढलेल्या प्रदूषणामुळे पावसाळी ढग निर्माण होण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येतो. दोन्ही प्रकारच्या परिणामांमुळे भूपृष्ठ थंडावते, वातावरणात स्थिरता येते आणि उष्णता पसरण्याची क्षमता कमी होते. यामुळे बाष्पीभवनात घट होऊन पर्जन्यमानावर परिणाम होतो.

पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरिओलॉजीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जमीन आणि समुद्राच्या तापमानातील फरकामुळे पाऊस पडतो.



हेही वाचा

मुलुंडमध्ये २८ ऑगस्टला रानभाज्या, कृषिमाल विक्री महोत्सव

पावसानं फिरवली पाठ, मुंबईत तीन दिवसात तापमानात 'इतकी' वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा